शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

अकरावी प्रवेशाचा अखेरचा दिवस

By admin | Updated: July 4, 2015 00:02 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रत्यक्ष प्रवेश सुरू : पॉलिटेक्निकच्या अर्ज विक्री-स्वीकृतीला मुदतवाढ

कोल्हापूर : अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. अर्ज भरलेल्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी शुक्रवारी दिवसभरात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी आपला प्रवेश निश्चित केला. आज, शनिवारी अकरावीसाठी प्रत्यक्ष प्रवेश घेण्याचा अखेरचा दिवस आहे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे.केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने गेल्या चार दिवसांपूर्वी निवड यादी प्रसिद्ध केली. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. तक्रारी नोंदविण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस होता. शहरातील कॉमर्स कॉलेज (वाणिज्य) आणि गोखले कॉलेज (विज्ञान) या तक्रार निवारण केंद्रांवर गेल्या तीन दिवसांत ३०८ तक्रार अर्ज दाखल झाले. त्यापैकी ४१ मान्य, २६२ अमान्य आणि ५ तक्रारी प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष प्रवेश घेण्याचा शनिवारी अंतिम दिवस आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर सोमवारी (दि. ६) दहावीतील ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी सांगितले. ‘आयटीआय’मधील विविध अभ्यासक्रमांच्या १ हजार ३६६ जागांसाठी ३ हजार १८ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. अभ्यासक्रमांसाठी विकल्प भरण्याची शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत अंतिम मुदत होती. शनिवारी सकाळी निवड यादी आॅनलाईन प्रसिद्ध होईल. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाला प्रारंभ होणार आहे. निवड यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर, मूळ कागदपत्रांसाठी उपस्थित रहाणे आवश्यक असल्याचे ‘आयटीआय’चे प्राचार्य दिनेश माने यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांत पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. या फेरीतील प्रवेश निश्चितीची रविवारी (दि. ५) अंतिम मुदत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन आणि खासगी पॉलिटेक्निकमधील प्रवेश अर्जांची विक्री आणि स्वीकृतीला रविवारपर्यंत (दि. ५) मुदतवाढ मिळाली आहे. अर्ज विक्री, स्वीकृतीसह हरकती नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाजी विद्यापीठातील विविध २२ पदव्युतर अभ्यासक्रमांच्या निवड यादीची शुक्रवारी आॅनलाईन प्रसिद्धी झाली. याबाबत हरकती नोंदविण्याची प्रक्रिया झाल्यानंतर अंतिम निवड यादीची प्रसिद्धी होणार आहे. (प्रतिनिधी)शाहू कॉलेजमध्ये बी.लिब. प्रवेश सुरूकदमवाडी येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये मुक्त विद्यापीठाचे बी. लिब आणि आय.एससीचे शिक्षणक्रम सुरू केले आहेत. त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती ग्रंथपाल एस. बी. कोरडे यांनी दिली.