शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लमाणवाडातील टाकी कोरडीच

By admin | Updated: May 17, 2017 23:14 IST

चार वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अर्ध्यावरच

रवींद्र हिडदुगी ।  लोकमत न्यूज नेटवर्कनेसरी : नेसरीपासून सहा कि.मी. अंतरावर असलेल्या मौजे हडलगे (ता. गडहिंग्लज) पैकी लमाणवाडा वसाहतीसाठी शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी गेल्या चार वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. या टाकीमध्ये पाणी कधी पडणार, असा प्रश्न लमाणवाडावासीयांत आहे.जेमतेम १०० वस्ती असणाऱ्या लमाणवाडा वसाहतीकरिता मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी गावपुढाऱ्यांकडून पाठपुरावा न झाल्याने ना रस्ता, ना पाणी अशा अवस्थेत इथली जनता जीवन जगत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेली ही वसाहत कोळसा तयार करून विकण्याचा व्यवसाय करते; पण जंगलतोडीवर मर्यादा आल्याने त्यांना आता शेती व गुरे, शेळीपालन करून उपजिविका करावी लागत आहे.सुरुवातीस कमी असलेली लोकसंख्या आता मुलाबाळांसह १००वर पोहोचली आहे. या वसाहतीसाठी द्विशिक्षकी शाळा असून १२ विद्यार्थी पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शिक्षणासाठी चिमुकल्यांना २ ते ३ कि.मी. रस्ता तुडवून जावे लागते. पावसाळ्यात तर त्यांचे खूप हाल होतात.सध्या त्यांना घटप्रभा नदी व वसाहतीशेजारी असलेल्या कूपनलिकांवरच तहान भागवावी लागत आहे. मात्र, नदीपात्रात वरून वाहून येणाऱ्या मृत प्राण्यांच्या (कुत्रे, रेडके) दुर्गंधीमुळे त्यांना कूपनलिकेचाच आधार आहे, परंतु कूपनलिकेचेही पाणी आटल्यास त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यांची ही गरज ओळखून हडलगे ग्रामपंचायतीने २०१२-१३ मध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाईपलाईन खोदली, तसेच दहा हजार लिटर क्षमतेची आरसीसी टाकी उंचावर बांधली. तसेच गावकऱ्यांच्या दारापर्यंत पाईपलाईन टाकून नळही बसविले; पण त्यामध्ये आतापर्यंत पाण्याने स्पर्श केलेला नाही. लाखो रुपये खर्चून निर्माण केलेल्या योजनेचा नागरिकांना लाभ होत नसेल तर या योजना काय कामाच्या? शासन व ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे गत चार वर्षांपासून ही टाकी पाण्याअभावी कोरडी आहे. रस्ता, वीज व पाणी या मूलभूत सुविधांपैकी गतवर्षी या वसाहतीमध्ये फक्त वीज पोहोचली आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर या वसाहतीमध्ये प्रकाश पडला. आता पाणी कधी पडणार, असा प्रश्न आहे.दृष्टिक्षेपातलमाणवाडा वसाहत ही महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर महाराष्ट्राच्या हद्दीत आहे. ही वसाहत हडलगे ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. या वसाहतीकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता जंगलातून आहे. आरोग्य, शिक्षण व अन्य सोयीसाठी त्यांना नेसरी किंवा कर्नाटकातील दड्डी या गावावरच अवलंबून राहावे लागते.