शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लँडमाफियांकडून मुंबईच्या व्यापाऱ्यांना बेदम मारहाण

By admin | Updated: February 21, 2016 01:23 IST

रंकाळ्यातील घटना : साठ हजार काढून घेतले

कोल्हापूर : जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी आलेल्या मुंबईच्या दोघा व्यापाऱ्यांना रंकाळा येथील हॉटेल शालिनी पॅलेससमोर कोल्हापुरातील लॅँडमाफियांनी बेदम मारहाण केली. कपिलेश्वर विजयकुमार जोशी (वय ३४), धर्मपुरी नारायण सिद्राम (४२, दोघे रा. वरळी, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना अर्धनग्न अवस्थेत सोडून त्यांच्याकडील एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेत खात्यावरील साठ हजार रुपये काढून घेतले. या दोघांनाही मित्रांनी सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. ही घटना शुक्रवारी (दि. १९) मध्यरात्री घडली. हाफिज नावाच्या लॅँडमाफियासह अन्य चौघांनी मारहाण केल्याची माहिती जखमी जोशी यांनी जुना राजवाडा पोलिसांना दिली आहे; परंतु त्यांनी या लॅँडमाफियांच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत फिर्याद न दिल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. व्यापारी जोशी यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. याबाबत अधिक माहिती अशी, कुडाळ येथील हाफिज (पूर्ण नाव माहीत नाही) हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. मुंबईतील व्यापारी कपिलेश्वर जोशी व धर्मपुरी सिद्राम या दोघांना रंकाळा परिसरात व कुडाळ येथे जमीन खरेदी करायची होती. हाफिज याच्या मध्यस्थीने त्यांनी स्थानिक लॅँडमाफियांशी संपर्क साधला. त्यांनी या दोघांना जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी कोल्हापूरला येण्यास सांगितले. त्यानुसार दोघेजण इनोव्हा कारमधून शुक्रवारी रात्री कोल्हापुरात आले. स्थानिक मित्र अभय जगताप यांना सोबत घेऊन त्यांनी हाफिज याच्याशी संपर्क साधला असता त्याने त्यांना रंकाळा येथील शालिनी पॅलेस हॉटेलसमोर येण्यास सांगितले. मध्यरात्री बाराच्या सुमारास ते त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी चौघेजण थांबून होते. त्यांनी जमिनीसंदर्भात चर्चा केली. यावेळी लॅँडमाफियांनी तुम्हाला जमीन दाखविली आहे, असे सांगून अ‍ॅडव्हान्स पैसे देण्याची मागणी केली. ‘जमीन न पाहता दाखविली कशी म्हणता?’ अशी विचारणा जोशी यांनी केली. त्यावरून त्या चौघांनी त्यांच्याशी वादावादी करीत त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना अर्धनग्न केले. त्यानंतर जोशी यांच्याकडील एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेत त्यावरून साठ हजार रुपये काढून घेत पोबारा केला. त्यानंतर मित्र जगताप यांनी या दोघांना ‘सीपीआर’मध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या अंगावर मारहाणीचे वळ उठले होते. या घटनेची माहिती समजताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हवालदार शकुंतला मोहळकर ह्या ‘सीपीआर’मध्ये आल्या. त्यांनी जखमी कपिलेश्वर जोशी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आता आपली मानसिक स्थिती बरोबर नाही; शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देईन असे सांगितले. तसा लेखी जबाब घेऊन त्या निघून आल्या. दरम्यान, शनिवारी दिवसभर जखमी दोघेही व्यापारी पोलीस ठाण्याकडे फिरकलेच नाहीत. पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी तपास अधिकाऱ्यांकडे याप्रकरणी चौकशी केली. व्यापारी व लॅँडमाफिया आपापसांत प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)