शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासाठी जमिनीवरील स्थगिती उठणार

By admin | Updated: July 27, 2014 22:58 IST

भारत पाटणकर : मुंबईतील बैठकीत विविध प्रश्नांवर निर्णय

चरण : युपीए आघाडीच्या केंद्रसरकारने मंजूर केलेल्या भूसंपादन पुनर्वसन व धरणग्रस्तांच्या कायद्यातील नव्या तरतुदींची अंमलबजावणी करणे, १९७६ पूर्वीच्या धरणांच्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लागणारा निधी तातडीने देणे, धरण व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनामध्ये अडथळा निर्माण झालेली जमीन वाटपाची स्थगिती उठवून तातडीने धरणग्रस्तांना पुनर्वसनापोटी जमीन उपलब्ध करून वाटप करण्याचा निर्णय मुंबई येथील बैठकीत झाल्याची माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.श्रमिक मुक्ती दलाने उपस्थित केलेल्या धोरणात्मक मुद्द्यांबाबत राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधींची मंत्रालयात निर्णायक बैठक झाली. या बैठकीस मदत पुनर्वसन मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासह महसूल, अर्थ व नियोजन, ग्रामविकास, जलसंपदा व वने आदी विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी पुनर्वसन व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.डॉ. पाटणकर म्हणाले, धरणग्रस्तांना दिलेल्या जमिनींना सिंचनाचा लाभ देऊन त्या बागायती करणे अशा सर्व मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रखडलेल्या वांग धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी निधी देण्याचाही आदेशही देण्यात आले. ३५० पेक्षा जास्त लोकसंख्येच्या धरणग्रस्त वसाहतींच्या स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापण्याची मोहीम राबवण्याचा आदेश झाला.भावाप्रमाणे बहिणींना समान न्यायाने स्वतंत्र खातेदार धरून पुनर्वसनाचा लाभ देण्यासाठी वेगळे संकलन रजिस्टर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी दिलीप पाटील, मेजर सुभेदार बन, दिलीप गायकवाड, वसंत ऊर्फ वाय. सी. पाटील, मोहन अनपट, डी. के. बोडके, संतोष गोटल, जगन्नाथ विभुते, अंकुश शेडगे उपस्थित होते. (वार्ताहर)