शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुस्तान अँटिबायोटिक्सची जमीन विकणार

By admin | Updated: December 22, 2016 00:47 IST

आर्थिक विपन्नावस्थेमुळे बंद पडलेल्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लि. (एचएएल) या केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपनीची पुण्याजवळ

कोल्हापूर : कायद्याने १४ दिवसांत ‘एफआरपी’ देणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी कायदाच धाब्यावर बसविला आहे. यंदा साखरेचे दर चांगले असतानाही ३० नोव्हेंबरअखेर केवळ पाच कारखान्यांनी पूर्ण रक्कम अदा केली आहे. ऊस बिलापोटी कारखान्यांकडे अद्यापही सुमारे ३०० कोटी रुपये अडकले आहेत. यंदा उसाची कोंडी लवकर फुटल्याने जिल्ह्यात ५ नोव्हेंबरपासून गळीत हंगामास सुरुवात झाली. उसाचे उत्पादन कमी असल्याने साखरेचे दर स्थिर राहणार हे निश्चित होते. त्यानुसार गेले महिनाभर घाऊक बाजारात सरासरी ३४०० रुपये साखरेचा दर राहिला आहे. त्यामुळे उसाची पहिली उचल देण्यास कारखान्यांना फारशी अडचण राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. हंगाम सुरू होऊन ४५ दिवस उलटले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ३५ लाख टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप झाले आहे. १४ दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही साखर कारखान्यांच्या प्रथेप्रमाणे १५ दिवसांचे ऊस बिल राखूनच शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. त्यानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देणे अपेक्षित होते. परंतु, ‘दालमिया-आसुर्ले’, ‘दत्त-शिरोळ’, ‘डी. वाय. पाटील-असळज’, ‘गुरुदत्त-टाकळीवाडी’, ‘नलवडे शुगर्स-म्हाळुंगे’ या पाचच कारखान्यांनी पैसे अदा केल्याचे दिसते. उर्वरित कारखान्यांनी बिलांची घोषणा केली असली तरी अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडलेले नाहीत. चलन तुटवड्यामुळे दुधाची बिले शेतकऱ्यांना मिळत नाहीत. त्यात दीड महिना झाला तरी उसाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. साखरेचे दर चांगले असतानाही कारखानदार १४ दिवसांचा कायदा पाळत नाहीत. याबाबत सरकारची भूमिका केवळ बघ्याचीच दिसत आहे. विभागात एक कोटी ८४ लाख टनांचे गाळपराज्यातील सात विभागांत आतापर्यंत एक कोटी ८४ लाख टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी उतारा १०.१८ टक्के राहिला आहे. सर्वाधिक गाळप पुणे विभागात ७२ लाख ८६ हजार, तर कोल्हापूर विभागात ६३ लाख ५३ हजार टन झाले आहे. कोल्हापूर विभाग ११.३१ टक्के साखर उतारा राखत आघाडीवर राहिला आहे. गत वर्षीपेक्षा ६० लाख टनाने उसाचे उत्पादन कमी झाले आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांची कुचेष्टासरकारच्या पातळीवर ऊस बिलांचा साधा आढावा घेतला जात नाही, हे दुर्दैवी आहे.चौदा दिवसांचा नियम धाब्यावर