शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर परिसरातील भूसंपादन अनावश्यक

By admin | Updated: April 17, 2015 00:05 IST

संघटनेचे महापौरांना निवेदन : अंबाबाई मंदिर विकास आराखडा फसवा असल्याचा आरोप

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा हा २००९ साली मांडलेल्या आराखड्याप्रमाणेच आहे. मंदिर परिसरातील जागा संपादित केल्याने ३०० कुटुंबे व ४०० व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे. मोठी शाळाही स्थलांतरित करावी लागणार असून, महाद्वार ही व्यापारी गल्ली असणारी ओळख पुसली जाणार आहे. गरज नसताना या परिसरातील भूसंपादन करण्याचा घाट घातला जात आहे. तरी सोमवारच्या सभेपुढे येणारा अंबाबाई मंदिर विकास आराखडा मंजूर करू नये, अशी मागणी श्री अंबाबाई मंदिर परिसर रहिवासी व व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे महापौर तृप्ती माळवी यांच्याकडे गुरुवारी केली.चार वर्षांपूर्वी केलेला आराखडाच पुन्हा दुसऱ्या नावाने सादर केलेला आहे. यावेळी आराखड्याविरोधात जनआंदोलन उभे राहिले होते. परिसरातील सर्वच घटकांचा मंदिराशी असणाऱ्या संबंधाचा या आराखड्यात अभ्यास झालेला नाही. व्यापाऱ्यांना विस्थापित केल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. विद्यापीठ हायस्कूल हलविल्यास त्याचा दोन हजार विद्यार्थ्यांना फटका बसेल. नवरात्री काळात दररोज सुमारे एक लाख भाविक देवीचे दर्शन घेतात. मंदिराच्या पूर्व बाजूस असलेली जागा या सर्व भाविकांना सामावून घेण्यास पुरेशी आहे. तरीही कोट्यवधी रुपये खर्चून ७५० भाविकांसाठी सभामंडप व बगीचा करणे, ही निव्वळ उधळपट्टी ठरणार आहे. मंदिर परिसरातील दाटी कमी करण्यासाठी फेरीवाल्यांचे व्यवस्थित नियोजन करावे, अतिक्रमणाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)