शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जमीन गैरव्यवहारात वकिलास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:36 IST

कºहाड : ओगले काच कारखान्याच्या चौदा एकर जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करणाºया वकिलास शुक्रवारी कºहाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. याबाबत पाच वर्षांपूर्वी न्यायालयात फिर्याद दाखल झाली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तब्बल पाच वर्षानंतर वकिलास अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे पाच वर्षांपूर्वी फिर्याद; ओगले ग्लासच्या जमिनीत घोटाळ्याचा आरोप; बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप७ रोजी पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.याबाबत पाच वर्षांपूर्वी न्यायालयात फिर्याद दाखल झाली होती.

कºहाड : ओगले काच कारखान्याच्या चौदा एकर जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करणाºया वकिलास शुक्रवारी कºहाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. याबाबत पाच वर्षांपूर्वी न्यायालयात फिर्याद दाखल झाली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तब्बल पाच वर्षानंतर वकिलास अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

अ‍ॅड. विजय भगवान पाटील (रा. मंगळवार पेठ, कºहाड) असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात औंध संस्थानच्या प्रमुख गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्यासह अनेकांचे जबाब यापूर्वीच घेण्यात आले आहेत. या जबाबातून संबंधित जमिनीत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. तपासात तांत्रिक बाबी समोर आल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी थेट अ‍ॅड. विजय पाटील यांनाच अटक केली. हजारमाचीचे पोलिस पाटील व ओगले काच कारखान्याचे संचालक मुकुंद नामदेव कदम यांनी सुमारे पाच वर्षांपूर्वी फिर्याद दिली होती.

पोलिसाच्या माहितीनुसार, ओगलेवाडी येथील ओगले काच कारखान्याला औंध संस्थानने ९९ वर्षांच्या कराराने १९२३ साली चौदा एकर १९ गुंठे जमीन नाममात्र भाडेतत्त्वाने दिली होती. ओगले काच कारखान्याच्या विसर्जनानंतर त्या जमिनीबाबत काही व्यवहार झाले. ते व्यवहार बनावट असल्याची फिर्याद मुकुंद नामदेव कदम यांनी न्यायालयात ७ जुलै २०१२ रोजी दाखल केली. न्यायालयाने त्याच्या सखोल पोलिस तपासाचे आदेश दिले. ओगले काच कारखान्याची सिटी सर्व्हे नं. ४४, ४८, ४९, ५०, ५१ याचे व्यवहार झाले आहेत. ते व्यवहार भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन अधिकारी विक्रम सोनवणे यांच्याशी संगनमत करून झाले असल्याचा आरोप आहे.

सोनवणे यांनी याप्रकरणी त्याचवेळी अटकपूर्व जामिन घेतला आहे.अ‍ॅड. विजय पाटील यांनी केलेल्या व्यवहारामध्ये ओगले काच कारखान्याची या जागेवरची नोंद बनावट कागदपत्राद्वारे रद्द केली असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याप्रकरणात आमणे नावाच्या व्यक्तीची कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. ती बाबही पोलिस तपासात समोर आली आहे. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची बनावट सही व नाव या व्यवहारासाठी वापरण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार या प्रकरणात गायत्रीदेवी यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

कोणत्याही प्रकारची सही अथवा खरेदीपत्राला परवानगी दिली नसल्याचे गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे गायत्रीदेवी यांचीही फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले. पोलिसांकडून गत पाच वर्षांपासून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.दरम्यान अ‍ॅड. पाटील यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिन अर्ज केला. मात्र, तोही नामंजूर झाला. या प्रकरणात आणखी तांत्रिक माहिती आल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी अ‍ॅड. विजय पाटील यांना अटक केली.तीन दिवसांची पोलिस कोठडीअ‍ॅड. विजय पाटील यांना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्या. एस. एम. पाडोळीकर यांनी त्यांना दि. ७ रोजी पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अ‍ॅड. विजय पाटील यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक, विश्वासघात केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.