शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या सुरक्षेसाठी रेडियम रिफ्लेक्टर बनले दीपस्तंभ

By admin | Updated: December 26, 2014 00:04 IST

दिनकर चौगुले यांचा उपक्रम : तब्बल १५०० लोकांना मिळाला लाभ

सरदास चौगुले - पोर्ले तर्फ ठाणे --रामप्रहरी किंवा तिन्ही सांजेच्यावेळी आरोग्यासाठी फिरायला जाणारे तसेच रात्री-अपरात्री मेंढपाळांसाठी वाट तुडवित जाणाऱ्या धनगरांना वाहनाच्या धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी रिफ्लेक्टर (रेडियम) लावलेल्या १५०० काठ्यांचे मोफत वाटप पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी केले. उत्साही जीवनाचा संकल्प म्हणून मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या मंडळींना नजरेसमोरची वाहने दिसतात; पण मागून येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी अपघाताची शक्यता अधिकच असते आणि वास्तवात घडतही आहे. रिफ्लेक्टर लावलेली काठी चालणाऱ्याच्या हातात असली म्हणजे वाहनचालक सावध होतो आणि अपघातासारखा धोका टळू शकतो, असा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून दिनकररावांनी १५०० लोकांना रिफ्लेक्टर चिकटवलेल्या काठ्यांचे वाटप केल्या. त्यांनी पोर्ले तर्फ ठाणे परिसरातील पंचगंगा पुलावर, वाशी नाका, फुलेवाडी नाका या ठिकाणी मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांना काठ्या वाटप केल्या आहेत. तसेच रात्री-अपरात्री मेंढपाळांसाठी वाट तुडवित जाणाऱ्या मेंढपाळांच्या हातात असणाऱ्या कुऱ्हाडीच्या दांड्याला रिफ्लेक्टर चिकटवले आहे. तसेच दालमिया (आसुर्ले पोर्ले) साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या १४० बैलगाड्यांना रिफ्लेक्टरच्या पट्ट्या चिकटवल्या आहेत. निसर्गमित्र दिनकर चौगुले यांच्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे. असेही बक्षिसपंचगंगा पुलावरती रिफ्लेक्टर चिकटवलेल्या काठ्यांचे वाटप करताना दिनकररावांना एक ज्येष्ठ गृहस्थाने ५०० रुपयांची नोट खिशात घातली आणि त्यांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदनही केले.शाहूपुरी येथील रिक्षा हाऊसमध्ये रिफ्लेक्टरच्या पट्टीच्या खरेदीसाठी गेलो होतो. तेव्हा त्या दुकानातील मालकांनी या एवढ्या पट्ट्यांचे काय करणार असे विचारल्यावर मी माझ्या उपक्रमाची माहिती दिली. तेव्हा त्यांनी ३००० रुपयांचे रिफ्लेक्टर फुकट दिले. त्यांच्या या प्रेरणेने मी हा उपक्रम उत्साहाने राबवला आणि त्याचे कौतुकही झाले. त्यामुळे मदतीला हात देणारी माणसे विरळच असतात.- दिनकर चौगुले, निसर्गमित्र