शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा बारा लाखांचे दागिने लंपास

By admin | Updated: August 29, 2014 00:07 IST

इचलकरंजीतील घटना : दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद

इचलकरंजी : येथील गांधी पुतळा चौकातील चौंडेश्वरी ज्वेलर्स दुकानाजवळून सुमारे बारा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना आज, गुरुवारी घडली. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पिशवी लंपास करणारे चोरटे दुकानाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दरम्यान, दिवसाढवळ्या चोरीची घटना घडल्याने परिसरासह सराफ व्यावसायिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.गांधी पुतळ्याजवळ उत्तम शामराव ढवळे यांचे चौंडेश्वरी ज्वेलर्स नामक दुकान आहे. ज्वेलर्स दुकानाजवळच त्यांच्या भावाचे हॉटेल असून, या ठिकाणी वडीलही काम पाहतात. दररोज रात्री हॉटेल आणि ज्वेलर्सचे दुकान बंद करून ढवळे कुटुंबीय घरी जातात. नेहमीप्रमाणे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उत्तम ढवळे ज्वेलर्स दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या पायरीवर घाण पडल्याचे दिसले. त्यामुळे ढवळे यांनी त्यांच्याकडे असलेली कापडी पिशवी वडील शामराव ढवळे यांना सांगून हॉटेल काउंटरच्या आत ठेवली. त्यानंतर दुकानाची पायरी स्वच्छ करून थोड्या वेळात ते परत आले असता ठेवलेली कापडी पिशवी जाग्यावर नव्हती. सुमारे बारा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, तसेच दुकानाच्या किल्ल्या असलेली पिशवी लंपास झाल्याने शोधाशोध सुरू केली.यावेळी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हॉटेलमध्ये वडापाव खाण्यासाठी आलेल्या १६ ते २० वर्षे वयाच्या दोघा अज्ञातांनी पिशवी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. भरचौकात असलेल्या या हॉटेलमधील चोरीची घटना समजताच दुकानाजवळ नागरिकांनी गर्दी केली होती. ढवळे यांनी याबाबत गावभाग पोलीस ठाण्यास माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक जगदीश धर्मे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर उत्तम ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीत पिशवीतील मंगळसूत्र, टॉप्स, डूल, रिंगा, अंगठ्या, कर्णफुले असे एकूण ३९० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख ३३ हजार असा सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे नमूद केले. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजवर मिळालेल्या माहितीद्वारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)