शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

महापुरात ३ लाख शेतकऱ्यांचे १३०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:40 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने ७८ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, तीन ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने ७८ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, तीन लाख सात हजार शेतकऱ्यांचे १२९९ कोटी ६५ लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या शेतकºयांना राज्य आपत्ती निवारण मदत निधीतून ६३० कोटी २० लाख, तर केंद्रीय आपत्ती निवारण मदत निधीतून १०५ कोटी ४४ लाख रुपये मिळणार आहेत.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने जनजीवन अक्षरश: उद्ध्वस्त केले. महापुराच्या पाण्याने नदी, ओढ्याच्या काठावरील पिके पाण्याखाली गेली. अतिवृष्टीने बांधफुटी होऊन उर्वरित पिके गाढली गेली. प्रलयकारी महापुराच्या पाण्यात आठ-१0 दिवस ऊस व भात पिके राहिल्याने कुजली. पिकांच्या नुकसानीचा अंदाज राज्य सरकारने मागविला होता. त्यावेळी एक लाख पाच हजार हेक्टरवरील पिके बाधित असल्याचा अंदाज वर्तविला होता. यामध्ये सर्वाधिक ७५ हजार हेक्टरवरील ऊस पिकांचा समावेश होता. पावसाने उघडीप दिल्यानंतर महसूल, कृषीसह इतर विभागांच्या अधिकाºयांनी पंचनामे सुरू केले. पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले असेल, तरच संबंधित शेतकºयांचा पंचनामा केला. तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकाºयांनी थेट बांधावर जाऊन पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. दोन दिवसांपूर्वी पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, यामध्ये ७८ हजार १०२ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला आहे.यामध्ये ६१ हजार ९९९ हेक्टर उसाच्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. भाताचे ८४६६ हेक्टर, तर सोयाबीनचे २६७२ हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचे निदर्शनास आली आहेत. एकूण तीन लाख सात हजार ७१८ शेतकºयांची ७८ हजार १०२ हेक्टरमधील पिके बाधित झाली असून, त्यांचे १२९९ कोटी ६५ लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला आहे.शेतकºयांना केंद्रीय आपत्ती निवारण मदत निधीतून १०५ कोटी ४४ लाख, तर राज्य आपत्ती निवारण मदत निधीतून ६३० कोटी २० लाख असे ७३५ कोटी ६४ लाखांची मदत मिळणार आहे. सरकारकडे अहवाल गेला असला, तरी शेतकºयांच्या हातात पैसे पडण्यास किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.उसाला हेक्टरी १.१३ लाखाची मदतउसाला राज्य आपत्ती मदत निधीतून हेक्टरी एक लाख, तर केंद्रीय आपत्ती निधीतून १३ हजार ५०० रुपये असे एक लाख १३ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. भाताला राज्याकडून हेक्टरी ६८०३ रुपये, तर केंद्राकडून १३ हजार ५०० असे २० हजार, तर सोयाबीन व भुईमुगाला तेवढीच मदत मिळणार आहे.पीकनिहाय झालेले नुकसान हेक्टरमध्ये असे-पीक अतिवृष्टी महापूर एकूणऊस ३५७५ ५८४२३ ६१९९९भात १७६० ६७०६ ८४६६सोयाबीन ६५८ २०१४ २६७२भुईमूग ५१४ १७४८ २२६२भाजीपाला २६२ ६२३ ८८५फुले ६ ६४ ७०फळे ५२ ५१ १०३