शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

पदांच्या लाचारांनी आंबेडकरी मंचावरील अधिकार गमावला

By admin | Updated: April 4, 2016 00:59 IST

भारत पाटणकर यांची नामोल्लेख टाळून रामदास आठवलेंवर टीका

कोल्हापूर : समाजातील जातिव्यवस्था कायम राहावी असा प्रयत्न करणाऱ्यांशी संगत करत मंत्रिपद, महामंडळ अध्यक्ष या पदांसाठी लाचार झालेल्यांनी आंबेडकरी विचाराच्या व्यासपीठावर बसण्याचा अधिकार गमावला आहे, अशी टीका रामदास आठवले यांचा नामोल्लेख टाळून श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी रविवारी केली. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ क्रियाशील कार्यकर्ते व नेते अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम झाला. डॉ. पाटणकर म्हणाले, रोहित वेमुलाची विनागोळीची हत्या करणारी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. घटनेत बदल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. वंदे मातरम् व राष्ट्रगीतासंबंधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेते जाणीवपूर्वक वाद निर्माण करत आहेत. भांडवलशाही व जातीयवादी यांचे संबंध घट्ट झाले आहेत. अशावेळी घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ व्यापकपणे गतिमान करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १५ एप्रिलला सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांतील आंबेडकरी विचारांच्या लोकांचा मेळावा भरवूया. या मेळाव्यात डॉ. आंबेडकर यांनी सांगितलेल्या मुक्तीचा एल्गार करूया. गुरव म्हणाले, कोणाही शहाणी व्यक्ती अस्वस्थ होईल, असे वातावरण आहे. म्हणून आता डॉ. आंबेडकर यांच्या विचाराचे पारायण होणे गरजेचे आहे. सडोलीकर म्हणाले, शालेय जीवनापासूनच डॉ. आंबेडकरी विचाराचा प्रभाव पडला. त्यातून चळवळीत सक्रिय झालो. वकिली करत समाजाच्यासाठी रस्त्यावरील लढाई लढत आहे. यावेळी अ‍ॅड. सडोलीकर, पत्नी भारती, आई हिराबाई, वडील तुकाराम यांचा सन्मानचिन्ह, चळवळीतील पुस्तके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अरुण कडाळे, जानबा कांबळे, कुमार दाभाडे, मलाप्पा कांबळे, नामदेव कांबळे यांचाही सत्कार झाला. डॉ. ज. रा. दाभोळे यांनी स्वागत केले. अनिल म्हमाणे, नंदकुमार गोंधळी, अस्मिता दिघे यांची भाषणे झाली. कडोली व कसबा आळते वाचनालयास पुस्तके देण्यात आली. ‘महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. सुनील पाटील, संदीप संकपाळ, मच्छिंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन, तर मैत्रेयी कमल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) भागवत यांच्याशी वैर नाही वैऱ्याने वैर संपवता येत नाही. अवैऱ्यानेच संपवणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, भैया जोशी यांच्याशी आमचे वैर नाही. ते आमच्याकडे वैरत्वाने पाहत असतील, पण आम्ही अहिंसेचे राज्य निर्माण व्हावे, यासाठी विहार करत आहोत, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.