शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

स्वच्छतेचा अभाव, डासांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: April 16, 2015 00:00 IST

सम्राट नगर, मालती अपार्टमेंट परिसर : कचराकुंड्या भरलेल्या, ‘केएमटी’चेदुर्लक्ष; काही भागात रस्त्यांची दुरवस्था

इंदुमती गणेश/सचिन भोसले - कोल्हापूर शहरातील मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय नागरिकांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सम्राट नगर येथील मालती अपार्टमेंट परिसरात गटारींची अस्वच्छता, कचऱ्याच्या उठावाचा अभाव, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव अशा समस्या भेडसावत आहेत. शिवाय परिसरात ‘केएमटी’ची पुरेशी सोय नाही... या सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी ‘लोकमत’पुढे व्यक्त केली. ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी बुधवारी मालती अपार्टमेंट परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी रहिवाशांनी मोकळेपणाने आपल्या समस्या मांडल्या व त्यांच्या सोडवणुकीची अपेक्षा व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकास झालेल्या आणि टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या या परिसरात गटारी तुंबण्याचा मोठा प्रश्न आहे. मुख्य रस्त्यालगत मोठमोठ्या गटारी करण्यात आल्या आहेत. मात्र, तेथे कचरा साठत असल्याने गटारी वारंवार तुंबतात; त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव आहे. परिसरात एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. त्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त असून, ते परिसरातून हटविण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. कचरा उठाव वेळेवर होत नाही, घंटागाडी येत नाही; त्यामुळे कचराकुंड्या भरून वाहतात; पण वारंवार सांगूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. रस्त्यांची झाडलोट होत नाही; पण याकडे सफाई कामगार गांभीर्याने कधीच पाहत नाहीत, असे एका नागरिकाने सांगितले. भागात काही ठिकाणी पाण्याची वानवा आहे. शिवाय गढूळ पाणी येत असल्याने ते पिण्यायोग्य नसते, अशी व्यथा एका महिलेने मांडली. नागरिकांना प्रवास करण्यासाठी केएमटी बसेस वाढविण्यात याव्यात, अशी मागणी आहे. भागात रस्त्यांची कामे बऱ्यापैकी झाली आहेत. काही ठिकाणी मात्र अजून काम बाकी आहे. परिसरातील उद्यान विकसित होणे गरजेचे आहे.पावसाचे पाणी थेट घरातगटारी व्यवस्थित न बांधल्यामुळे मोठ्या पावसात पाणी रस्त्यावरून थेट घरांत शिरते. त्याचबरोबर गटारी वेळोवेळी साफ न केल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. - सुजाता पाटील, पायमल वसाहतबसच्या फेऱ्या वाढवाके.एम.टी. प्रशासन दोन तासांनी या परिसरातून बस देत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. याचबरोबर रस्त्यावरील ड्रेनेजचे पाणी पावसाळ्यात संपूर्ण रस्त्यावर येते. - दीपक पाटील, जागृतीनगररस्ते व्यवस्थित नाहीतपायमल वसाहत, सम्राटनगरकडे जाणारे अंतर्गत रस्ते अजूनही खराब अवस्थेत आहेत. त्यामुळे धड चालतही जाता येत नाही. गटारी वेळेवर स्वच्छ न केल्याने त्या तुंबण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. - दिगंबर कुलकर्णी, प्रतिभानगर, निधीची कमतरतापायमल वसाहत, मालती अपार्टमेंट परिसरात महापालिकेच्या अर्थसंकल्पामधून निधीच कमी आल्याने अनेक कामे अपुरी राहिली आहेत. येत्या काही दिवसांत अपुरा निधी जर मिळाला तर अपुऱ्या कामांना न्याय देता येईल.- राजू हुंबे, नगरसेवकमोकाट जनावरांचा त्रासपरिसरात मोकाट श्वानांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. . - उज्ज्वला मिस्किन, राधाकृष्ण संकुलपरिसरातून बसेस सोडाशिवाजी विद्यापीठाकडे जाणाऱ्या बसेस कमी सोडण्यात येत आहेत. त्यामुळे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असूनही नागरिकांना तासन्तास बसची वाट पाहावी लागते. - राजाराम पाटील, कचरा उठाव कराजागृतीनगरातील कचरा उठाव वेळोवेळी केला जात नाही. त्यामुळे परिसरात सायंकाळी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. महापालिकेने डास प्रतिबंधक औषधे फवारणी केली पाहिजे. - राजश्री पाटील, पायमल वसाहतरस्ता व्हावागायत्री एंटरप्राईज ते पद्मालय बंगला या मार्गावरील रस्ता गेली कित्येक वर्षे केलेला नाही. त्यामुळे हा रस्ता नव्याने होणे गरजेचा आहे. - केसरीमल ओसवाल, प्रतिभानगरसफाई कामगारांची वानवाअनेकदा सफाई कर्मचाऱ्यांना सांगूनही ते या भागातील कचरा उठाव करीत नाहीत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. - पारस जाधव, सम्राटनगरनालेसफाई व्हावीमालती अपार्टमेंटसमोरील नालेसफार्ई वेळेवर होत नाही. त्यामुळे सायंकाळी डासांचेच साम्राज्य असते. पाणीपुरवठाही वेळेवर होत नाही. - मधुकर चौगुलेस्वच्छतागृह अन्यत्र हलवापायमल वसाहतीमध्ये असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाचा परिसरातील नागरिकांना दुर्गंधीमुळे त्रास होत आहे. तरी ही स्वच्छतागृहे नवीन तरी बांधावीत अन्यथा तेथून हलवावीत.- सोनम भादवणकरपुलाचे बांधकाम निकृष्टमालती अपार्टमेंट रोडवरून शिवाजी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या पुलाच्या कॉँक्रीटमधील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. - रफिक मुल्ला