शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
4
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
5
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
6
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
7
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
8
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
9
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
10
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
11
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
12
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
13
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
14
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
15
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
16
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
17
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
18
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
19
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
20
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा

भाजपप्रणीत आघाडीत समन्वयाचा अभाव

By admin | Updated: July 8, 2017 00:13 IST

इचलकरंजी नगरपालिका : कॉँग्रेसकडून सत्तारूढ आघाडीवर टीका; जनतेच्या सेवा-सुविधांबाबत गांभीर्य नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : नगरपालिकेतील बाजार कर वसुलीचा मंजूर केलेला ठेका रद्द करण्याचे आश्वासन, मद्यविक्रेत्यांसाठी रस्ते हस्तांतरणाची बोलविलेली पालिकेची सभा ऐनवेळेला रद्द करणे अशा बाबींतून भाजपाप्रणीत आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर वारणा नळ योजनेच्या कामासाठी होणारे दुर्लक्ष आणि शहर स्वच्छतेबाबत ‘बीव्हीजी’सारख्या नामवंत संस्थेला छुपा विरोध होणे यामुळे जनतेसाठी अत्यावश्यक असलेल्या सेवा-सुविधांचे सत्तारूढांना गांभीर्य नसल्याची टीका कॉँग्रेसचे पक्षप्रतोद शशांक बावचकर यांनी पत्रकार बैठकीत केली.नगरपालिकेच्या २३ जून २०१७ रोजीच्या सभेत ७० लाख ३ हजार रुपयांना बाजार वसुलीचा खासगी ठेका देण्याचा ठराव भाजपाप्रणीत सत्तारूढ आघाडीने बहुमताने मंजूर केला. हा ठेका म्हणजे सर्वसामान्य विक्रेत्यांसाठी जीझिया कर असल्यामुळे खासगी ठेका देण्यास कॉँग्रेस व राजर्षी शाहू आघाडीने विरोध केला होता. मात्र, सत्तारूढांनी तो डावलून कर वसुलीचा ठेका बहुमताने मंजूर केला. त्याच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किरकोळ विक्रेत्यांनी आंदोलन केले. शुक्रवारचा आठवडी बाजार बंद पाडण्याचा इशारा दिला. त्यामुळे जागे झालेल्या सत्तारूढांनी आंदोलनकर्त्यांना ठेका रद्द करण्याचे आश्वासन दिले. पण सभेमध्ये आम्ही वसुलीचा ठेका देण्याबाबत गांभीर्य लक्षात आणूनसुद्धा त्याच्याकडे कानाडोळा करण्यात आला. केवळ आपल्या काही कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी बाजार कराचा ठेका दिला गेला, असाही आरोप बावचकर यांनी केला.मद्यविक्रेते व परमीट रूमधारकांना त्यांची दुकाने व हॉटेल पुन्हा सुरू करण्यास मुभा मिळावी, यासाठी रस्ते हस्तांतरणाचा प्रस्ताव आणणारी विशेष सभा नगराध्यक्षांनी बोलावली. मात्र, त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली, असे सांगून ते पुढे म्हणाले, अशा अनेक गोष्टींतून नगरपालिकेतील सत्तारूढ आघाडीमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी कमालीचे गोंधळाचे वातावरण असल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर झाला आहे. नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या सेवा-सुविधासुद्धा देण्यामध्ये नगरपालिका कमी पडत आहे.वारणा नळ पाणी पुरवठा योजनेचे जॅकवेल- पॉवर हाऊस, आदी बांधण्याचा ठेका कंत्राटदाराला मंजूर झाला आहे. पण जॅकवेल-पॉवर हाऊससाठी दानोळी (ता.शिरोळ) येथे घेतलेली जागा नगरपालिकेच्या ताब्यात नसल्यामुळे कंत्राटदारांकडून त्याठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरूवात झालेली नाही. असे असूनसुद्धा वारणा नळ योजनेसाठी ३५ कोटी रुपयांचे नळ खरेदीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. वारणा नळ योजनेच्या प्रत्यक्ष कामास प्रत्यक्षात सुरूवात नसताना नळ खरेदी करण्यासाठी होणारी घाई हे सुद्धा सत्तारूढ गटाच्या कामाचे दिवाळे वाजविणारे आहे.तसेच शहर स्वच्छतेसाठी नामवंत असलेल्या भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) या कंपनीला निविदा मंजूर करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू असतानाच त्या कंपनीला ठेका न देण्याबाबत नगरपालिकेतील एक गट कामाला लागला आहे. म्हणजे नगरपालिकेमध्ये दर्जेदार कामे होऊ नयेत, असाच सत्तारूढ आघाडीचा मानस आहे का? असाही प्रश्न बावचकर यांनी उपस्थित केला. बाहेरील शक्तीचा हस्तक्षेपउत्पन्नवाढीच्या गोंडस नावाखाली सत्तारूढ आघाडीकडून बाजार कराच्या ठेक्याचे खासगीकरण केले जात आहे. ठेकेदाराकडून किरकोळ सर्वसामान्य विक्रेत्यांकडून अन्यायकारकरित्या बाजार कर वसुली होणार, हे माहीत असूनसुद्धा केवळ आपली माणसे सांभाळण्यासाठी सत्तारूढ आघाडीने ठेका दिला आणि त्याला होणारा तीव्र विरोध पाहून तो रद्द करण्याचे आश्वासन दिले. यामुळे नगरपालिकेच्या कामकाजामध्ये बाहेरील शक्ती हस्तक्षेप करीत असल्याचे स्पष्ट होत असल्याबद्दल बावचकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.‘आयजीएम’ बाबत अक्षम्य दिरंगाई१ आयजीएम हॉस्पिटलचे शासनाकडे होणाऱ्या हस्तांतरणाबाबत अक्षम्यपणे दिरंगाई होत आहे. त्याचबरोबर होणाऱ्या दुर्लक्षामुळे दवाखान्याकडील ७० अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. २ वास्तविक पाहता यांची जबाबदारी सत्तारूढ भाजपने घेऊन शासन दरबारी वजन वापरणे आवश्यक होते. ज्यामुळे दवाखाना सुरळीतपणे सुरू होण्यास मदत मिळाली असती. पण भाजपाकडून त्याची जबाबदारी उचलली जात नाही, असे दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.