शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाड। स्वच्छता मोहीम युध्दपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST

शहरातील पुराचे पाणी धिम्या गतीने उतरत असून मध्यवर्ती भागातील अंतर्गत रस्ते, घरांतील पाणी ओसरले आहे. महापुरानंतर दलदल आणि घाणीच्या ...

शहरातील पुराचे पाणी धिम्या गतीने उतरत असून मध्यवर्ती भागातील अंतर्गत रस्ते, घरांतील पाणी ओसरले आहे. महापुरानंतर दलदल आणि घाणीच्या साम्राज्यातून साथीचे आजार पसरू नये यासाठी पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम युध्दपातळीवर राबवत आहे. त्यामुळे पाणी ओसरलेला भाग स्वच्छ करून औषध फवारणी करत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

महापुराने शहरातील जुना राजवाडा परिसर आणि माळभाग वगळता संपूर्ण शहरात पाणी होते. शहरातील चारही रस्त्यावर पाणी आल्याने शहराला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. अद्यापही नृसिंहवाडी कुरुंदवाड रस्त्यावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.

पूर ओसरल्यानंतर दलदल आणि दुर्गंधीयुक्त पाणी, कचरा यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी याबाबत सतर्क राहून पुराचे पाणी जसे उतरत जाईल, तसे पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता केली जात आहे. स्वच्छतेबरोबर जंतुनाशक फवारणी, धुराची फवारणी, गटारी स्वच्छ करून वाहते केले जात आहे. त्यामुळे शहर स्वच्छ होत असल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.

फोटो -