गटनिहाय बिनविरोध निवडलेले नवनिर्वाचित सदस्य असे :
प्रभाग क्रमांक : १ : एकनाथ सुतार (इतर मागास प्रवर्ग, मुश्रीफ गट), मेघा मनोज बेलवळेकर (खुला प्रवर्ग महिला, राजे विक्रमसिंह घाटगे गट), जयवंतराव राजाराम पाटील (खुला प्रवर्ग, पुरुष, मंडलिक गट) प्रभाग क्रमांक : २ : मीनाक्षी दिनकर कुंभार (इतर मागास प्रवर्ग महिला,मंडलिक गट) .सुरेखा अरुण पाटील (खुला प्रवर्ग महिला, मंडलिक गट), गिरीष सयाजीराव पाटील (खुला प्रवर्ग, पुरुष, मुश्रीफ गट) प्रभाग क्रमांक : ३ : .मनिषा अमित कांबळे (अनुसूचित जाती, महिला, मुश्रीफ गट), विवेक पांडुरंग कांबळे (अनुसूचित जाती पुरुष, संजय घाटगे गट), सौ. अनिता कृष्णात पाटील (खुला प्रवर्ग महिला, मुश्रीफ गट) ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रवीण पाटील (ग्रामसेवक), अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी वीरेंद्र मगदूम (ग्रामसेवक) यांनी प्रशासकीय पातळीवर सहकार्य केले.
मंडलिक गटाचे प्रमुख, ‘बिद्री’चे माजी संचालक आर. डी. पाटील, मुश्रीफ गटाचे बी. आर. पाटील, विकास पाटील, महेश पाटील, व्ही. डी. पाटील, राजे गटाचे आप्पासाहेब बेलवळेकर, सुनील कांबळे, संजय घाटगे गटाचे बी. जी. चौगुले, आदींनी विशेष प्रयत्न केले.