सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूर येथून वारणा सहकारी साखर कारखान्यासाठी ऊसतोडणीसाठी मजूर कुंभोज येथे दाखल झाले होते. अभिजितला पोहता येत नसल्याची माहिती मामा जाधव यांनी दिली. परिणामी, सकाळी बारा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत या विहिरीभोवती नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या विहिरीमध्ये अभिजित पाणी आणण्यासाठी गेला होता. घागर व त्याचे चप्पल, टाॅवेल विहिरीच्या काठावर सापडल्याने तो विहिरीत पडला असल्याचा संशय बळावला आहे. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांत झाल्याची माहिती मामा जाधव यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत विहिरीत अभिजित याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
कुंभोजमध्ये ऊसतोड मजुराचा विहिरीत पडून मुत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:39 IST