अधिक माहिती अशी, एकवीरादेवीचे दर्शन घेऊन महाबळेश्वर येथून कुडाळकडे निघालेल्या क्रेटा गाडीचा उत्तूर येथील वळणावर अपघात झाला. चालक ओमकार मेघनाथ वालावकर (वय २४, रा. कुडाळेश्वरवाडी, ता. कुडाळ) यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार रस्त्यावरील पोलला धडकून उलटली. यामध्ये जगन्नाथ बाबू कुंभार (३०), बाबूराव परब, ओंकार मेघनाथ वालावलकर (२४, रा. लक्ष्मीवाडी, ता. कुडाळ) हे चारजण जखमी झाले.
जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून तातडीने उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दखल करण्यात आले. आजरा ग्रामीण रुग्णालय येथे रोहितचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एस. कोचरगी करीत आहेत.
याबाबत बाबूराव सुभाष परब (वय २९, रा. नावरवाडी, ता. कुडाळ) यांनी आजरा पोलिसांत वर्दी दिली आहे.
रोहित फेकला गेल्याने मृत्यू
भरधाव वेगात कार वळण घेत असताना सिमेंटचे खांब उचकटून उलटली. वेगामुळे रोहित कारधून बाहेर फेकला गेल्याने रस्त्यावर पडला. डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रोहित हा एकुलता मुलगा होता. आई घरकाम करते, तर वडील विकलांग असल्याने घरीच असतात. आकस्मिक घडलेल्या घटनेमुळे कुंभारवाड्यात हळहळ व्यक्त होत आहे.
-
* उत्तूर (ता. आजरा) येथे मुमेवाडी-उत्तूर मार्गावर ताबा सुटून उलटलेली कार. क्रमांक : १४०१२०२१-गड-०२
* रोहित कुडाळकर : १४०१२०२१-गड-०३