शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘केएमटी’चा तिमाही पास लवकरच

By admin | Updated: February 6, 2015 00:45 IST

३८ हजार पासधारकांना लाभ : ‘केएमटी’कडेही आगाऊ पैसे जमा होणार

कोल्हापूर : कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट (केएमटी)तर्फे येत्या आठ दिवसांत तिमाही पास योजना सुरू करण्यात येणार आहे. शहर व परिसरातील दहा हजार विद्यार्थी व २७ हजार इतर सवलतींचा पास वापरणाऱ्यांचे त्यामुळे हेलपाटे वाचणार आहेत; तर ‘केएमटी’कडे आगाऊ तीन महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी केले आहे.रेल्वेप्रमाणे केएमटीनेही तिमाही पासची योजना सुरू करावी, अशी मागणी अनेक पालकांनी ‘लोकमत हेल्पलाईन’द्वारे केली होती. ‘केएमटी’ प्रशासनाने याबाबतची सर्व तांत्रिक प्रक्रिया आता पूर्ण केली आहे. पास केंद्रातून खासगी कंपनीद्वारे पासचे वाटप केले जाते. आर्थिक ओढाताणीमुळे केएमटी प्रशासनाकडून मोठी रक्कम ठेकेदारास देणे लागत असल्याने तिमाही पास योजना रखडली होती. आता केएमटीने ठेकेदारास पहिला ५० हजारांचा हप्ता अदा केला आहे. चार दिवसांत दुसरा हप्ताही दिला जाणार आहे. यानंतर तिमाही पास योजना सुरू केली जाणार असल्याचे प्रभारी व्यवस्थापक संजय भोसले यांनी सांगितले. ‘केएमटी’तर्फे तब्बल दहा हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ४० ते ६० टक्क्यांपर्यंत बसच्या मासिक भाड्यामध्ये सवलत दिली जाते. दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ४० टक्के, सातवी ते दहावीपर्यंत ५० टक्के, तर पहिली ते सातवीपर्यंत ६० टक्के मासिक भाड्यामध्ये ‘केएमटी’ सवलत देते. शहर व परिसरातील विविध महाविद्यालयांत व शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होतो. तसेच इतर २० दिवसांच्या भाड्यात ३० दिवस प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या तब्बल २७ हजार इतकी आहे. पासधारकांच्या संख्येच्या मानाने ‘केएमटी’च्या पास वाटप केंद्रांची संख्या खूपच तोकडी आहे. फक्त महाराणा प्रताप चौक येथेच सवलतीचा पास मिळतो. पाससाठी तब्बल चार-चार तास ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे शाहू मैदान चौक येथे लवकरच आणखी एक पास वाटप केंद्र सुरू होणार असल्याचे व्यवस्थापक संजय भोसले यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)