शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

केएमटी दुर्घटना : तिघांची प्रकृती अद्याप अत्यवस्थच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 18:08 IST

पापाची तिकटी ते गंगावेश दरम्यान ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसल्याने झालेल्या दुर्घटनेतील जखमी झालेल्या २१ पैकी १३ जणांवर सीपीआर, अ‍ॅस्टर आधार आणि राजारामपुरीतील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती अद्याप अत्यवस्थ आहे. तर इतरांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

ठळक मुद्दे२१ पैकी १३ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारगंभीर जखमी आनंदा राऊत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू तिघांची प्रकृती अद्याप अत्यवस्थ इतरांच्या प्रकृतीत सुधारणा

कोल्हापूर, 2 : पापाची तिकटी ते गंगावेश दरम्यान ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसल्याने झालेल्या दुर्घटनेतील जखमी झालेल्या २१ पैकी १३ जणांवर सीपीआर, अ‍ॅस्टर आधार आणि राजारामपुरीतील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती अद्याप अत्यवस्थ आहे. तर इतरांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

प्रकृती गंभीर असलेल्यांमध्ये आनंदा राऊत (वय ५५), पृथ्वीराज अरविंद भंडारी (१४), साहिल घाटगे (१४, सर्व रा. राजारामपुरी, तिसरी गल्ली) यांचा समावेश आहे. नेहमी गजबजलेल्या पापाची तिकटी ते गंगावेश या मार्गावर रविवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास ताबूत विसर्जन मिरवणुकीत भरधाव केएमटी बस घुसल्याने दोनजण जागीच ठार झाले. तर एकूण १८ जण जखमी झाले.

संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीच्या हल्ल्यात एक महिला पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाच्या गाडीचा चालक व एस. टी. बसचालक जखमी झाले. अशा एकूण २१ जखमींपैकी आठजणांवर प्रथमोपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. तर इतर १३ जखमींपैकी आठजणांवर प्रथमपोचार करून त्यांना सोमवारी पहाटे खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आले. त्यापैकी शास्त्रीनगरमधील अ‍ॅस्टर आधार रुग्णालयात सहा रुग्ण, तर राजारामपुरीतील सिटी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केएमटीचे अपघात विभागप्रमुख व माजी सैनीक पी. बी. जाधव यांनी दिली.

प्रकृती गंभीर असलेल्यांमध्ये आनंदा राऊत (वय ५५) यांच्यावर सिटी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या मेंदूत अतिरक्तस्त्राव झाला आहे. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात अडचण असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून, त्यांची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

सिटी रुग्णालयात साहिल घाटगे या मुलाच्या दोन्ही पायांवरही सोमवारी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यांच्याही पायावरून बसचे चाक गेल्याने पायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

राजारामपुरीतील पृथ्वीराज भंडारी याही मुलावर अ‍ॅस्टर आधार रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याच्याही हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.