शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

क्षीरसागर-पवार यांच्यात पुन्हा ठिणगी

By admin | Updated: September 9, 2015 00:18 IST

मानसन्मान मिळत नसल्याची तक्रार : संजय पवारांसह समर्थक कार्यक्रम सोडून परतले

कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील वर्चस्वाचा वाद मंगळवारी दुपारी पुन्हा उफाळून आला. त्यातूनच शहरप्रमुख शिवाजी जाधव यांच्या ताराबाई रोडवरील संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सुरू होण्यापूर्वीच पवार यांच्यासह त्यांचे समर्थक कार्यक्रम सोडून निघून गेले.आमदार क्षीरसागर व पवार यांच्यात पक्षनेतृत्वाने समझोता घडवून आणला व पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदिलाने काम करण्याचे आदेश दिले; परंतु हे मनोमिलन झाले नसल्याचेच दिसून येत आहे. मंगळवारी दुपारी आमदार क्षीरसागर यांचे समर्थक शहरप्रमुख जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होते. शिंदे कार्यक्रमस्थळी यायचे होते. पण, अगोदरच संजय पवार, कमलाकर जगदाळे, दत्ता टिपुगडे, शशी बिडकर, रणजित आयरेकर, आदी कार्यकर्ते गेले. तिथेही पवार यांचे फलकावर छायाचित्र नसल्याचे पाहून त्यांच्या समर्थकांचा राग उफाळून आला.आमदार समर्थकांकडून शहरात जे फलक लावले आहेत, त्यावरही जाणीवपूर्वक पवार यांचे छायाचित्र वापरले जात नाही किंवा जाणीवपूर्वक ते खालच्या बाजूस वापरण्यात येत असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. संपर्क कार्यालय उद्घाटनाच्या निमंंत्रण पत्रिकेतही माजी जिल्हाप्रमुख विजय कुलकर्णी यांच्या नावाखाली पवार यांचे नाव वापरण्यात आले आहे. त्याचाही जाब कार्यकर्त्यांनी विचारला. तुम्हाला पवार यांच्याबद्दल राग असेल तर समजू शकतो, परंतु किमान पदाचा तरी अवमान करू नका, असे कार्यकर्त्यांनी सुनावले. त्यानंतर आमदार गटाच्या तिथे उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गैरसमज करू नका, जाणीवपूर्वक काही केले नसल्याचे सांगण्यात आले; परंतु पवार यांचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते या उद्घाटन समारंभास उपस्थित न राहताच निघून गेले. सायंकाळच्या मेळाव्यास मात्र ते उपस्थित होते. सायंकाळी मंत्री एकनाथ शिंदे यांनीही मतभेद गाडून टाकण्याचे आवाहन मेळाव्यात केले.