शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल- पाटाकडील ‘ब’-मंगळवार पेठ यांच्यातील लढत बरोबरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:12 IST

के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ व मंगळवार पेठ फुुटबॉल क्लब यांच्यातील लढत ३-३ अशी बरोबरीत राहिली. सामन्यात ‘पाटाकडील’च्या वैभव देसाईने तीन, तर मंगळवार पेठच्या नितीन पोवारने दोन गोल केले.

ठळक मुद्देके.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉलपाटाकडील ‘ब’-मंगळवार पेठ यांच्यातील लढत बरोबरीत

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ व मंगळवार पेठ फुुटबॉल क्लब यांच्यातील लढत ३-३ अशी बरोबरीत राहिली. सामन्यात ‘पाटाकडील’च्या वैभव देसाईने तीन, तर मंगळवार पेठच्या नितीन पोवारने दोन गोल केले.छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी या दोन संघांत सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून पाटाकडील ‘ब’च्या खेळाडूंनी सामन्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संघाच्या वैभव देसाई, प्रथमेश पाटील, रोहित पवार, यश देवणे, ऋषिकेश मोरे, आदींनी वेगवान चढाया करीत मंगळवार पेठ संघाची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या १६ व्या मिनिटाला वैभव देसाईने गोल नोंदवत संघाला १-० अशी बढत दिली.‘मंगळवार’कडून बरोबरी साधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ३६ व्या मिनिटाला वैभव देसाईने संघाचा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. ‘मंगळवार’कडून सामन्याच्या ४० व्या मिनिटाला नितीन पोवारने गोल नोंदविला. त्यामुळे २-१ अशी सामन्याची स्थिती झाली.उत्तरार्धात मंगळवार पेठ संघाकडून नितीन पोवार, आकाश माने, आदित्य लाड, ऋषिकेश पाटील, शिवम पोवार, सचिन राघव यांनी खोलवर चढाया केल्या. सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला मंगळवार पेठ संघाच्या आकाश मायणे याने गोल नोंदवत सामना २-२ असा बरोबरीत आणला.

त्यानंतर नितीन पोवारने सामन्याच्या ५२ व्या मिनिटाला गोल नोंदवत ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या जादा वेळेत पाटाकडील ‘ब’च्या वैभव देसाई याने गोल नोंदवीत सामना ३-३ असा बरोबरीत आणल्यामुळे दोन्ही संघांना मिळाला. 

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर