शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’च्या आरोपींचा जामीन फेटाळला !

By admin | Updated: April 21, 2017 21:47 IST

आर्थिक गुन्ह्यात जामीन नको, सरकारी युक्तिवाद

कऱ्हाड : कृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी अटकेत असणाऱ्या माजी संचालकांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी येथील प्रथमवर्ग न्या. एस. एम. पाडोळीकर यांच्यासमोर सुनावणी झाली. आर्थिक गुन्ह्यातील संशयितांची जामिनावर मुक्तता करू नये, असा युक्तिवाद यावेळी सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने नऊ माजी संचालकांचा जामीन नाकारला. तत्कालीन कार्यकारी संचालक अशोक श्रीरंग नलवडे (रा. मंगळवेढा), अशोक मारुती जगताप (५५, रा. वडगाव हवेली), सर्जेराव रघुनाथ लोकरे (५२, रा. येरवळे, ता. कऱ्हाड), संभाजी रामचंद्र जगताप (७३, कोडोली, ता. कऱ्हाड), बाळासाहेब दामोदर निकम (६९, रा. शेरे, ता. कऱ्हाड), उदयसिंह प्रतापराव शिंदे (५०, रा. बोरगाव), वसंत सीताराम पाटील (६८, रा. नेर्ले, ता. वाळवा), महेंद्र ज्ञानू मोहिते (५६, रा. वाटेगाव, ता. वाळवा), चंद्रकांत विठ्ठल भुसारी (रा. टेंभू, ता. कऱ्हाड) अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. कृष्णा कारखान्यातील बोगस कर्ज प्रकरणाच्या आरोपावरून यापूर्वीच माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)कारखाना, संघ व बँकेकडून फसवणूकबँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून संशयितांनी वाहतूक कंत्राटदारांच्या नावे बोगस कर्ज काढले आहे. कर्जाची रक्कम संघाच्या नावावर वर्ग करण्यात आली. ती संपूर्ण रक्कम २०१३-१४ च्या पूर्वीच्या कर्जास वर्ग करून ती खाती बंद केली. त्यामुळे कारखाना, संघ व बँक यांनी स्वत:च्या फायद्यासाठी ७८४ कंत्राटदारांचे आर्थिक नुकसान व फसवणूक केल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. नागनाथ गुंडे यांनी केला.