नवे पारगाव : ग्रामपंचायत वाठार (ता. हातकणंगले) व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना लसीकरण महाशिबिर आज, शुक्रवारी (दि. १७) आयोजित केले असून, गावातील सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन भादोले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी माहेश्वरी कुंभार यांनी केले आहे.
वय वर्षे १८ वरील व ज्यांचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत अशा सर्व नागरिकांनी शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यास सहकार्य करावे.
लसीकरण आज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वाठार उपकेंद्र, अंबप फाटा अंगणवाडी, हनुमान मंदिर, सम्राट अशोक नगर, समाज मंदिर, महादेव मंदिर, साखरवाडी अंगणवाडी येथे होणार आहे. लसीकरणासाठी येताना सर्वांनी cowin.gov.in वर नोंदणी करून मोबाईल नंबर, फोन सोबत घेऊन यावे.