शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

कागलमधील गणेशोत्सवाला विधायकतेचे ‘कोंदण’

By admin | Updated: September 6, 2016 23:44 IST

विधायकतेचा ‘यू’ टर्न : प्रबोधनाचीच ‘पायाभरणी’; गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यावरच मंडळांचा भर

दत्तात्रय पाटील --म्हाकवे --राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असणाऱ्या कागल तालुक्यातील गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यावरच येथील तरुण मंडळांचा भर आहे. सामाजिक सलोखा, समाजोपयोगी प्रबोधनात्मक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचीच तालुक्यातील अनेक मंडळामध्ये जणू रस्सीखेच सुरू आहे. कागल व मुरगूड पोलिसांनी प्रत्येक गावातील तरुण मंडळाच्या बैठका घेऊन चर्चा केल्या. यावेळी कोणकोणते विधायक कार्यक्रम राबवितो याची यादीच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे तालुक्यातील गणेशोत्सवाला विधायकतेचे ‘कोंदण’ लाभल्याचे दिसत आहे. तालुक्यातील अनेक मंडळांनी रक्तदान, आरोग्य, नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजनही केले आहे.राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या या तालुक्यात गट-तटाचे राजकारण आहे. त्यामुळे ईर्षेतून अनेक मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. परंतु, मंडळामधील इर्षेने आता ‘विधायकतेचा यू टर्न’ घेतला आहे. जवळपास सर्वच गावांतील मंडळाच्या कार्यक्रम पत्रिका, नियोजन पाहिल्यानंतर बदलाचे वारे दिसून येत आहे.दरम्यान, कागल तालुक्यात सांस्कृतिक पायाभरणी व्हावी या दृष्टीने ‘शाहू’ ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्यासह कागलचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी व मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनीही प्रत्येक गावातील मंडळाच्या त्या त्या ग्रामपंचायत कार्यालयात बैठका घेतल्या. विघातक डॉल्बीचे दुष्परिणाम आणि बेंजो, लेझीम, झांजपथक, आदी पारंपरिक वाद्य संगीताचा उपयोग याबाबत प्रबोधनही केले आहे.