कोल्हापूर : टेनिस बॉल क्रिकेट ऑफ इंडिया आणि उत्तराखंड टेनिस बॉल राज्य असोसिएशनमार्फत हरिद्वार येथे २५ डिसेंबरपर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट संघात कोल्हापूर जिल्ह्यातील तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
उत्तराखंड येथील गुरू कांगारी विद्यापीठ, हरिद्वार येथे २५ डिसेंबरपर्यंत होणाऱ्या या अखिल भारतीय स्वामी विवेकानंद कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी या खेळाडूंची ही निवड झाली आहे.
यामध्ये रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालय, नेसरीचा सौमिल्य संग्रामसिंग पाटील, आजरा महाविद्यालयाचा शेखर मुकुंद पाटील आणि, वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूरचा जयवर्धन धनंजय पाटील यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
या सर्वांना रियाज शमनजी, सुलोचना रेडेकर, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी, डॉ. ऐ. न. सादळे, प्रा. अल्बर्ट फर्नांडिस, डॉ. डी. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------------------------------------------------------
२३१२२०२०-कोल-सौमिल्य संग्रामसिंग पाटील निवड
२३१२२०२०-कोल-शेखर मुकुंद पाटील निवड
२३१२२०२०-कोल-जयवर्धन धनंजय पाटील निवड
(संदीप आडनाईक)