शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे आयकर निरीक्षक पत्नीसह अपघातात ठार

By admin | Updated: February 21, 2016 01:24 IST

राजापूर तालुक्यात घटना : लग्नाच्या वाढदिनी काळाचा घाला

राजापूर : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीवरून फिरण्यासाठी आलेल्या दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. राजापूर तालुक्यात वाटूळनजीक टेम्पोवर बुलेट आदळून हा अपघात झाला. अपघातात मृत झालेले राकेशकुमार मीना (वय २६, रा. मूळ राजस्थान) कोल्हापूर येथे आयकर विभागात निरीक्षक पदावर काम करीत होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अर्जुन कफेरकीर (वय ३५, हणकणे, गोवा) हा आयशर टेम्पो (जीए ०४ टी ४५८४) घेऊन गोव्याहून मुंबईकडे चालला होता. त्याचवेळी राकेशकुमार मीना पत्नी आशाकुमारी यांच्यासह बुलेटवरून (एमएच ०९ डीजी ४२२४) निघाले होते. मुंबई-गोवा महामार्गावर वाटुळनजीक टेम्पोला ओव्हरटेक करताना राकेशकुमार यांची बुलेट टेम्पोवर आदळली. धडक एवढी जोरात होती की, हेल्मेट घालूनही राकेशकुमार यांच्या डोक्याला जबर मार लागला. यात मागे बसलेल्या आशाकुमारी या जागीच ठार झाल्या. राकेशकुमार यांना जबर मार लागल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. राजापूर पोलिसांनी टेम्पो चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)