शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयच्या मदतीसाठी सरसावले कोल्हापूरकर

By admin | Updated: February 6, 2017 01:05 IST

आवाहनाला प्रतिसाद : आर्थिक, पुस्तकची मदत

कोल्हापूर : आयएसएस अधिकारी होण्याच्या जिद्दीने अपंगत्वावर मात करून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या अक्षय पाटीलच्या मदतीसाठी कोल्हापूरकर सरसावले. पुस्तके, आर्थिक मदतीसाठी रविवारी समाजातील अनेक संवेदनशील व्यक्तींनी अक्षयशी संपर्क साधत मदतीचा हात पुढे केला. जन्मत:च अक्षयला मेनिंगोमायलोसिस (पाठीच्या मणक्यावरील ट्यूमर)मुळे अपंगत्व आले; परंतु तो खचला नाही दहावी-बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला पण ‘या पुढे उभा राहीन तर आयएएस बनूनच’ अशी जिद्द उराशी बाळगून वाटचाल सुरूच ठेवली. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अक्षयच्या आयएएस होण्याच्या स्वप्नांना बळ देत त्याला चांगले मार्गदर्शन मिळावे, पुस्तकांची खरेदी करता यावी यासाठी मदतीचे आवाहन करणारे वृत्त रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यास कोल्हापूर शहरासह कळंबा, राधानगरी, जयसिंगपूर आदी भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अक्षयला मदतीसाठी अनेकजण सरसावले. त्यामध्ये कळंब्यातील श्रीकांत गावकर यांनी दहा हजार रुपयांपर्यंतची पुस्तके देण्याचे आश्वासन दिले तर राधानगरी येथील दत्तात्रय सावंत यांनी आर्थिक मदत देऊ, असे फोन करून सांगितले. यासह अनेक निवृत्त शासकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांनी फोन करून लागेल ती मदत करू, असे सांगितलेच त्याचबरोबर अक्षयला प्रोत्साहनही दिले.