कोल्हापूर : आजकाल झपाट्याने होणारे शहरीकरण, वृक्षतोड, मोबाईल टॉवरची वाढती संख्या यामुळे शहरातील अनेक पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. यासाठी शिवाजी पेठ, रंकाळा तलाव परिसरातील पद्माराजे उद्यानातील वृक्षे तोडू नयेत, असे आवाहन केले. निमित्त होतं! निसर्ग संवर्धनाचा विचार जोपासण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित पक्ष्यांच्या जीवनावरील ‘स्लाईड शो’चे.दिवसें-दिवस पक्ष्यांच्या दुर्मीळ जाती संपत जात आहेत. आज रंकाळा तलावाभोवती तसेच बागेच्या काँक्रीटीकरणामुळे तसेच गर्द झाडी तोडल्यामुळे पक्षी या उद्यानात येतात. उद्यानातील रबर झाड तोडू नये व पक्षांचा आसरा (घरटे) काढून घेऊ नये. वृक्षांचे जतन, संवर्धन होण्यासाठी आपली पर्यावरणपूरक मानसिकता व्हावी व पर्यावरणविषयक प्रबोधन व्हावे, हाच यामागील उद्देश असल्याचे मिलिंद यादव यांनी सांगितले. विकास जाधव यांनी पक्ष्यांच्या निवारणासाठी आता पद्माराजे उद्यान ही एकमेव जागा आहे. येथे पक्ष्यांचा मोठा अधिवास असल्यामुळे या ठिकाणचे वृक्ष तोडू नयेत, असे आवाहन केले.प्रारंभी जिजाऊ राजमाता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिजाऊ ब्रिगेड, रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती, श्री राजे संभाजी तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, मरगाई गल्ली तरुण मंडळ यांच्यावतीने आयोजन केले होते. यासाठी खंडोबा तालीम मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पोवार, विकास जाधव, नाना मोरे, अमित शिंदे, सिद्धेश चौगले, संजय देवकर, आदींनी परिश्रम घेतले.
पक्षी संवर्धनासाठी कोल्हापूरकर सरसावले
By admin | Updated: January 14, 2015 00:43 IST