शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकर ! चला, पुण्यात घर घेऊया...

By admin | Updated: March 9, 2016 00:54 IST

‘लोकमत-पुणे प्रॉपर्टी शोकेस’ शनिवारपासून : पुण्यातील बांधकाम प्रकल्पांची मिळणार माहिती

कोल्हापूर : ‘स्मार्ट सिटी’ अशी ओळख असलेल्या पुण्यात आपले घर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. कोल्हापूरकरांची या स्वरूपाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या गृहप्रदर्शनाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘लोकमत’ने यावर्षी कोल्हापूरमध्ये पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांचे ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ हे प्रदर्शन शनिवारी (दि. १२) व रविवारी (दि. १३) हॉटेल पॅव्हेलियनमधील मधुसूदन हॉल येथे आयोजित केले आहे.या उपक्रमाचे हे यशस्वी चौथे वर्ष आहे. प्रदर्शनात पुण्यातील २० बांधकाम व्यावसायिकांचे १३५ हून अधिक गृहप्रकल्प कोल्हापूरकरांना पाहता येणार आहेत. यात अ‍ॅफोर्डेबल होम्स, लक्झुरिअस होम्स, व्यावसायिक प्रकल्प, ओपन प्लॉट असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय यावेळी कोल्हापूरकरांना पाहता येणार आहेत़ पुणे, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्यामुळे या प्रदर्शनामध्ये वेळेची व पैशांची बचत होणार आहे़ आपल्या स्वप्नातील व आपल्या गरजेप्रमाणे हवे असणारे मनपसंत घर येथे इच्छुक ग्राहकांना पाहता येणार आहे़ या प्रदर्शनासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक योजना आखल्या आहेत़ त्यांचाही लाभ या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना मिळणार आहे़ गेल्या तीन वर्षांमध्ये कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यांतील अनेक गृहइच्छुकांनी आपले पुण्यातील घर नक्की करीत हे प्रदर्शन यशस्वी केले आहे. पुण्यातील गृहप्रकल्पांची सखोल व सविस्तर माहिती मिळण्याची वर्षातील एकमेव संधी कोल्हापूरकरांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. तरी, इच्छुक नागरिकांनी या भव्य प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या गृहस्वप्नांची पूर्तता करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे़ पुण्याकडे नेहमीच कलपुण्याचा विस्तारणारा परीघ, घराच्या वाढत्या किमती, उच्च जीवनशैली, शिक्षणाचे नवनवीन पर्याय, नोकरी व उद्योगातील आधुनिक संधी यामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यांतील लोकांचा पुण्याकडे येण्याचा नेहमीच कल असतो़ पुण्यातील प्रॉपर्टीमधील गुंतवणूक ही आजवर अनेकांना फायदेशीर ठरल्यामुळे अनेकांकडून राहत्या घरासोबत सेकंड होम म्हणून पुण्याचाच विचार केला जातो़या नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभागगार्डियन डेव्हलपर्स, नाईकनवरे डेव्हलपर्स प्रा़ लि़, पाटे डेव्हलपर्स, कुशल लॅँडमार्क्स प्रा़ लि़, सिटी कॉर्पोरेशन, वसुधा लॅँडमार्क्स प्रा़ लि़, गोयलगंगा ग्रुप, सिद्धिविनायक गु्रप्स, निर्माण डेव्हलपर्स, मॅपल शेल्टर्स, सारथी ग्रुप, साईरंग डेव्हलपर्स, द स्केपर्स, शारदा ग्रुप, पार्कन्स ग्रुप, भंडारी असोसिएट्स़, श्री. व्यंकटेश बिल्डकॉन, प्लॅटिनम प्रॉपर्टी.