शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

संजय मंडलिकांच्या मेळाव्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी;युतीचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:47 IST

कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीचे लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या रविवारी रात्री झालेल्या मेळाव्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी ...

कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीचे लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या रविवारी रात्री झालेल्या मेळाव्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. युतीच्या उमेदवारासाठी दोन्ही कॉँग्रेसची मंडळी उपस्थित राहिल्याने आता हा नवा ‘कोल्हापूर पॅटर्न’ उदयाला आल्याचे सांगत, सर्वच वक्त्यांनी महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिक यांच्यावर सडकून टीका केली.येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. २४ मार्च रोजीची युतीची कोल्हापुरातील जाहीर सभा यशस्वी करण्याचा आणि मंडलिक यांना खासदार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, यावेळी कुणाचीही गद्दारी चालणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे ड्रोन तुमच्यावर नजर ठेवून आहे. कॉँग्रेसचा पाठिंबा आहे म्हणून केवळ त्यांच्यावर विसंबून न राहता काम करा.प्रारंभी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रविकिरण इंगवले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, आज सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे कोण निवडून येणार, हे सांगण्याची गरज नाही.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, की आमच्या युतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आज कॉँग्रेसची मंडळी उपस्थित आहेत. त्यांचे अभिनंदन करण्याची अशी वेळ येईल, असे वाटले नव्हते.संजय मंडलिक म्हणाले, भूकंपग्रस्त आणि पूरग्रस्त जसे असतात तसा कोल्हापूर जिल्हा ‘महाडिकग्रस्त’ आहे. शिवाजी चौकातील गणपतीसमोरून महाडिकांचा अश्वमेध सोडल्याचे महादेवराव महाडिक यांनी जाहीर केले होते.पुतण्या कोल्हापुरातून, सून पलीकडच्या लोकसभा मतदारसंघातून, पुतण्या सांगली जिल्ह्यातून निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला हे रुचले नाही. हा अश्वमेधाचा घोडा रोखण्याची ताकदराजर्षी शाहू महाराजांनी आणिपंचगंगेच्या पाण्याने इथल्या सर्वसामान्य माणसाला दिली आहे.यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, माजी महापौर विलास सासने, भारती पोवार, मारुतराव कातवरे, अ‍ॅड. महादेव आडगुळे, सागर चव्हाण, सुलोचना नाईकवडे, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे, अशोक देसाई, स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, विजय सूर्यवंशी, राजू लाटकर, संभाजी जाधव, आशिष ढवळे, गणी आजरेकर, मधुकर रामाणे, संदीप देसाई, विजय खाडे-पाटील, सुजित चव्हाण, प्रताप कोंडेकर, सुभाष रामुगडे, रमेश पुरेकर, प्रवीण केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.