शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

ऊस उत्पादनात ‘कोल्हापूर’ राहणार राज्यात भारी

By admin | Updated: January 22, 2017 23:59 IST

१ कोटी १७ लाख टन गाळप : पुणे विभाग मागे पडणार

कोल्हापूर : राज्यात यंदा उसाची टंचाई असल्याने बहुतांश कारखान्यांना आपले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार नाही. आतापर्यंत झालेल्या गाळपात कोल्हापूर विभाग आघाडीवर राहिला आहे. दरवर्षी पुणे विभाग पुढे असायचा; पण सोलापूर जिल्ह्यातील कारखाने उसाअभावी बंद राहिल्याने त्याचा फटका या विभागास बसला आहे. कोल्हापूर विभागाचे आतापर्यंत १ कोटी १७ लाख टन गाळप झाले असून, गाळपाबरोबर उताऱ्यातही विभाग राज्यात भारी ठरणार आहे. गतवर्षी राज्यात पडलेल्या दुष्काळाचा फटका यंदाच्या उसाच्या हंगामावर दिसत आहे. दुष्काळ व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाच्या उत्पादनात घट झाली आहे. अडीच महिने पूर्ण होण्याअगोदरच निम्म्याहून अधिक कारखाने बंद झाले आहेत. पुणे विभागात पुण्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या तिन्ही जिल्ह्यांत उसाचे उत्पादन व कारखान्यांची संख्या अधिक असल्याने पुणे विभाग राज्यात गाळपात आघाडीवर असतो; पण यंदा सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा मोठा फटका बसल्याने सुरुवातीपासूनच विभागातील कारखाने अडखळत सुरू झाले. गेल्या हंगामात सुमारे २ कोटी ३१ लाख टनांचे गाळप झाले होेते. यंदा आतापर्यंत १ कोटी १६ लाखांचे गाळप झाले आणि ५२ पैकी तब्बल २७ कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूर विभागात ४० कारखाने आहेत. त्यांतील चार कारखाने बंद झाले असून आतापर्यंत १ कोटी १७ लाख टनांचे गाळप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’, व ‘दत्त-शिरोळ’ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अजून ऊस आहे. त्यामुळे हे कारखाने मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालणार आहेत. उर्वरित कारखाने आणखी महिनाभर म्हणजेच फेबु्रवारीअखेर चालतील, असा साखर विभागाचा अंदाज आहे. गतवर्षी कोल्हापूर विभागात २ कोटी २७ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा तेवढे होणार नसले तरी किमान ते १ कोटी ६० लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा राज्यात ऊस गाळपात कोल्हापूर विभाग आघाडीवर राहणार, हे निश्चित आहे. गेल्या हंगामात राज्यात ४ कोटी ३९ लाख टनांचे गाळप झाले होते. यंदा आतापर्यंत ३ कोटी ७ लाखांपर्यंतच हंगाम आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा किमान ८० लाख टनांनी गाळप कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)विभागनिहाय झालेले गाळप विभागकारखानेगाळपसाखर उत्पादनउताराहंगाम बंद संख्याटनांतक्विंटलटक्के कारखान्यांची संख्याकोल्हापूर४०१ कोटी १७ लाख१ कोटी ३९ लाख११.८८४पुणे५२१ कोटी १६ लाख१ कोटी २५ लाख१०.७३२७अहमदनगर२३३७ लाख ३ हजार३५ लाख ६५ हजार९.६३१४औरंगाबाद १७१८ लाख २८ हजार८ लाख ८७ हजार८.८७१३नांदेड१११० लाख २५ हजार९ लाख ८२ हजार९.८२८अमरावती३२ लाख ४३ हजार२ लाख ३७ हजार९.७२३नागपूर४३ लाख १३ हजार३ लाख ६ हजार९.७९-एकूण१७५३ कोटी ७ लाख ३ कोटी ३४ लाख १०.८६ ६९८८ हजार४३ हजार