शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बंद कडकडीत पाळणार

By admin | Updated: June 5, 2017 01:14 IST

कोल्हापूर बंद कडकडीत पाळणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याने कोल्हापुरातील व्यवहार बंद राहणार आहेत. विविध संघटना व राजकीय पक्षांनी संपात उडी घेतली असून कडकडीत बंद पाळून तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, दुधाला ५० रुपये प्रतिलिटर दर द्या, शेतीमालाला हमीभाव द्या, आदी मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकरी संपावर आहेत. भाजीपाला, दुधासह इतर मालाची आवक-जावक ठप्प झाली आहे. सरकारच्या पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी संपूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत. आंदोलन तीव्र करण्यासाठी आज, सोमवारी सर्वच शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. त्यानुसार संघटनांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ‘कोल्हापूर बंद’चा निर्णय घेतला असून, त्या दृष्टीने नियोजन केले आहे. ‘सिटू’व किसान सभेच्या वतीने आज, सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनेही प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करून शेतकऱ्यांच्या भावना सरकारदरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहेत. गेले चार दिवस शेतकऱ्यांची आक्रमकता वाढत असून, ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिल्याने सगळी यंत्रणा कोलमडणार आहे. मोर्चामुळे तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालय आज दणाणणार आहे. शिवसेनाही संपात सहभागी आजच्या शेतकरी संपाला शिवसेनेने पाठिंबा दिला असून, संप यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवून बळिराजाला पाठिंबा द्यावा; अन्यथा शिवसैनिक त्यांचे व्यवहार बंद करतील, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रस व शिवाजी जाधव यांनी पत्रकातून दिला आहे.