शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरला नाही विसरणार...

By admin | Updated: February 13, 2017 00:49 IST

स्वभाव भावला : देशभरातील तरुणाईची भावना;

कोल्हापूर : पहिल्यांदाच राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी झालो अन् विविधांगी कलात्मक ज्ञान अनुभवयास मिळाले. नवे मित्र मिळाले. महोत्सवातून आनंदोत्सव साजरा करताना अनेक आठवणींनी मनात ऋणानुबंधाचे घर तयार केले आहे. इथल्या आठवणी जीवनात कायमच राहतील. कोल्हापूरचे वातावरण प्रेमळ असून त्याची सतत जाणीव होत राहील, अशा दिलखुलास भावना रविवारी ‘शिवोत्सव’मधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या. यात भोपाळच्या माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठाचा महेश प्रजापत म्हणाला, रायपूरपेक्षा अतिउत्तम कोल्हापूर आहे. एकमेकांना सहकार्य करण्याची प्रचंड इच्छाशक्ती इथल्या लोकांत आहे. पत्रकारितेचा विद्यार्थी असलो तरी कलेचा छंद असल्याने सहभागी होता आले. हा महोत्सव भविष्यात माझ्या करिअरसाठी उपयोगी ठरेल. बिहारमधील आॅलन मिथिला विद्यापीठाची स्नेह उपाध्या हिने महोत्सवातून मोठा आनंद मिळत असल्याचे सांगितले. ती म्हणाली, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्वभाव भावला. विद्यापीठातील निसर्गरम्य वातावरणाने माझी छायाचित्र टिपण्याची गोडी वाढविली असल्याचे छत्तीसगडमधील खैरागडाच्या इंदिरा संगीत कला विद्यापीठाच्या मिनीला साहू हिने सांगितले. अमृतसरच्या गुरुनानक विद्यापीठाचा सतवेंद्रपालसिंह म्हणाला, महोत्सवात विविध राज्यांतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मला ‘छोटा भारत’चे दर्शन घडले. हरियाणातील महर्षी दयानंद विद्यापीठाची प्राची शर्मा हिने महोत्सवातील सहभागाने आत्मविश्वास वाढला असून, कोल्हापूरचे वातावरण, जेवण खूपच छान वाटल्याचे सांगितले.