शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर अर्बन बॅँकेत सत्ताधारी पॅनेलची बाजी

By admin | Updated: April 7, 2015 01:21 IST

रवींद्र गुरव पराभूत : शिरीष कणेरकर यांना सर्वाधिक मते

कोल्हापूर : कोल्हापूर अर्बन बॅँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत बाजी मारली. विजयी उमेदवारांमध्ये सत्ताधारी पॅनेलचे प्रमुख शिरीष कणेरकर यांना सर्वाधिक ४,५५३ मते मिळाली. सोमवारी सकाळी विजयाची घोषणा झाल्यावर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. सर्वसाधारण व इतर मागासवर्ग या दोन्ही गटांतून अपक्ष उमेदवार असलेले रवींद्र गुरव पराभूत झाले.नागाळा पार्क येथील महावीर कॉलेजशेजारील आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कोळी यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. ३० टेबलांवर ही मोजणी झाली. एकूण २६ हजार ९१ पैकी ५ हजार ४२ इतके मतदान झाले होते. मतदान कमी असल्याने मतमोजणी प्रक्रिया दोन तासांतच आटोपली. यापैकी ३५० मतपत्रिका अवैध झाल्या. उर्वरित ४,८८५ मतदान मोजण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास डॉ. महेश कदम यांनी निकाल घोषित केला. यामध्ये सत्ताधारी पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. विजयी उमेदवारांसह समर्थकांनी गुलाल लावून विजयोत्सव साजरा केला. सत्ताधारी पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत दोन्ही गटांतून उभे राहिलेले अपक्ष उमेदवार रवींद्र गुरव प्रभाव पाडू शकले नाहीत. विजयी, पराभूत उमेदवारांची नावे व त्यांना पडलेली मतेसर्वसाधारण गट : विजयी उमेदवार : सत्ताधारी पॅनेलचे प्रमुख शिरीष कणेरकर (४,५५३), राजन भोसले (४,५४१), बाबासाहेब मांगुरे (४,५३८), शिवाजीराव कदम (४,५१७), जयसिंग माने (४,५०१), उमेश निगडे (४,४७२), पांडुरंग पाटील (४,४३५), यशवंतराव साळोखे (४,४३५), रवींद्र धर्माधिकारी (४,४२०), मधुसूदन सावंत (४,२५२). सर्वसाधारण गट : पराभूत उमेदवार : अपक्ष उमेदवार रवींद्र गुरव (७७६)इतर मागासवर्गीय गट : विजयी उमेदवार : सत्ताधारी पॅनेलचे सुभाष भांबुरे (४,४५०) इतर मागासवर्गीय गट : पराभूत उमेदवार : अपक्ष उमेदवार रवींद्र गुरव (४९१).बिनविरोध झालेले उमेदवारभटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून विश्वास काटकर, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून नामदेवराव कांबळे, महिला प्रवर्गातून सुमित्रा शिंदे व गीता जाधव यांची बिनविरोध निवड झाली. हे सर्व सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार आहेत.