शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट वितरणात कोल्हापूर देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:10 IST

नवी दिल्ली/ कोल्हापूर : सर्वांना सहजपणे पासपोर्ट मिळण्यासाठी सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात कोल्हापूर देशात अव्वल ठरले आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्या पाच शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरे आहेत.पिंपरी-चिंचवड दुसºया, तर औरंगाबाद पाचव्या स्थानावर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पासपोर्ट) ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. देशभरात २५१ पासपोर्ट केंद्र सुरू ...

नवी दिल्ली/ कोल्हापूर : सर्वांना सहजपणे पासपोर्ट मिळण्यासाठी सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात कोल्हापूर देशात अव्वल ठरले आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्या पाच शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरे आहेत.पिंपरी-चिंचवड दुसºया, तर औरंगाबाद पाचव्या स्थानावर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पासपोर्ट) ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. देशभरात २५१ पासपोर्ट केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. पहिल्या टप्प्यात ५९ केंद्र सुरू करण्यात आली.एकवीस हजारजणांना कोल्हापुरातून पासपोर्टकोल्हापूर पासपोर्ट सेवा केंद्रातून २१ हजार ९५ जणांना पासपोर्ट देण्यात आले आहेत. देशात हा उच्चांक आहे. पिंपरी-चिंचवडमधून २० हजार ८३, तर औरंगाबादमधून १४ हजार ९७३ पासपोर्ट वितरित करण्यात आले. पासपोर्ट वितरणात कर्नाटकातील म्हैसूर तिसºया, तर गुजरातमधील भूज चौथ्या क्रमांकावर आहे.गेल्या दहा महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील प्रधान डाकघरात पासपोर्ट केंद्र कार्यान्वित झाले. याठिकाणी आम्ही कमीत कमी कागदपत्रे आणि वेळेत पासपोर्टधारकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. या कामाची पोचपावती मिळाली आहे. पासपोर्ट वितरणात कोल्हापूर हे देशात प्रथम येणे हे अभिमानास्पद आहे.- रमेश पाटील, मुख्य अधीक्षक, प्रधान डाकघर कोल्हापूर