शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

कोल्हापूर-- दोन केंद्रांवर विशेष बंदोबस्त

By admin | Updated: October 15, 2014 00:44 IST

मतदानाची प्रक्रिया सुरक्षित व शांततेत होण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी

दोन केंद्रांवर विशेष बंदोबस्तकोल्हापूर उत्तर म्हणजे कोल्हापूर शहराचा प्रमुख गाभा असणारा मतदारसंघ होय. या मतदारसंघात सुमारे दोन लाख ८४ हजार मतदार संख्या आहे. या मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून या मतदार संघात आठ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. मतदान केंद्रातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे १६२१ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे. आज दुपारनंतर या कर्मचाऱ्यांच्या हाती मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य तसेच मतदान यंत्रे देण्यात आली. तत्पूर्वी, या मतदान यंत्रांची तपासणी करण्यात आली होती. आज हे सर्व साहित्य दिल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व साहित्य घेऊन कर्मचारी नेमून दिलेल्या मतदानकेंद्रावर पोहोचले. कर्मचाऱ्यांना केंद्रावर पोहोचवण्यासाठी एस.टी. बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय पोलीस यंत्रणा तसेच गृहरक्षक दलाचे पोलीसही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. या मतदारसंघात एकही केंद्र संवेदनशील नसल्याचा दावा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला असला तरीही दोन मतदानकेंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. शहरातील सर्व पेठा तसेच पूर्वेकडील उच्चभ्रू वस्ती असा परिसर असून कसबा बावडा, लाईन बाजार, भोसलेवाडी, बापट कॅम्प, कदमवाडी, राजारामपुरी, शाहूपुरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क हा सव्वा लाख मतदार संख्येचा गठ्ठा वाढला आहे. त्यामुळे या मतदार संख्येवर विशेषत: उमेदवारांचा डोळा राहिला आहे. या मतदारसंघात २८९ मतदारकेंद्रे असून दोन मतदान केंद्रे सहायक म्हणून आहेत. महापालिकेचे ४३ पूर्ण, तर ११ अर्धे मतदारसंघ असा दाट लोकवस्तीच्या मतदारांचा हा भाग आहे. याशिवाय या ठिकाणी सुमारे १८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. सर्वच केंद्रांवर पोलिसांची नजर

 

कोल्हापूर : विधानसभेच्या या निवडणुकीत ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदारसंघ संवेदनशील बनला आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी या मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया सुरक्षित व शांततेत होण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. दिवसभर पोलिसांची या मतदारसंघावर कडक नजर राहणार आहे.‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये काँग्रेसकडून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, भाजपकडून अमल महाडिक, शिवसेनेकडून विजय देवणे हे प्रमुख उमेदवार आहेत. या सर्वच उमेदवारांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनवत झंझावती प्रचारयंत्रणा राबविली. प्रचारातील वातावरणात लक्षात घेता या मतदारसंघाबाबत पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. पोलिसांच्या दृष्टीने जिल्ह्यात केवळ ‘कोल्हापूर दक्षिण’ संवेदनशील आहे. त्यानुसार या मतदारसंघातील पाचगाव, राजेंद्रनगर, संभाजीनगर, सानेगुरुजी वसाहत, उचगांव, गांधीनगर आदी परिसरात पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात असणार आहे. या परिसरातील मतदान केंद्रे तसेच त्यांच्या परिसरात कुणाकडूनही अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करण्याची पोलिसांनी तयारी केली आहे. गेल्या निवडणुकीवेळी २ लाख ७५ हजार ५६५ मतदार होते. त्यापैकी १ लाख ९० हजार २१७ जणांनी मतदान केले. यंदाचे एकूण मतदार ३ लाख १० हजार ७५५ असून त्यापैकी १ लाख ६० हजार ५४९ पुरुष, तर १ लाख ४९ हजार ३३३, इतर तीन आणि सैनिक मतदार ८७० इतके आहेत. एकूण मतदान केंद्रे ३०९ असून त्यापैकी सात सहायक मतदान केंद्रे आहेत. याठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष आणि दहा टक्के राखीव असे एकूण १६६९ आहेत. त्यात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक, दोन आणि तीन हे प्रत्येकी ३४० आणि शिपाई ३०९ इतके आहेत. कोल्हापूर : विधानसभेच्या या निवडणुकीत ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदारसंघ संवेदनशील बनला आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी या मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया सुरक्षित व शांततेत होण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. दिवसभर पोलिसांची या मतदारसंघावर कडक नजर राहणार आहे.‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये काँग्रेसकडून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, भाजपकडून अमल महाडिक, शिवसेनेकडून विजय देवणे हे प्रमुख उमेदवार आहेत. या सर्वच उमेदवारांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनवत झंझावती प्रचारयंत्रणा राबविली. प्रचारातील वातावरणात लक्षात घेता या मतदारसंघाबाबत पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. पोलिसांच्या दृष्टीने जिल्ह्यात केवळ ‘कोल्हापूर दक्षिण’ संवेदनशील आहे. त्यानुसार या मतदारसंघातील पाचगाव, राजेंद्रनगर, संभाजीनगर, सानेगुरुजी वसाहत, उचगांव, गांधीनगर आदी परिसरात पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात असणार आहे. या परिसरातील मतदान केंद्रे तसेच त्यांच्या परिसरात कुणाकडूनही अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करण्याची पोलिसांनी तयारी केली आहे. गेल्या निवडणुकीवेळी २ लाख ७५ हजार ५६५ मतदार होते. त्यापैकी १ लाख ९० हजार २१७ जणांनी मतदान केले. यंदाचे एकूण मतदार ३ लाख १० हजार ७५५ असून त्यापैकी १ लाख ६० हजार ५४९ पुरुष, तर १ लाख ४९ हजार ३३३, इतर तीन आणि सैनिक मतदार ८७० इतके आहेत. एकूण मतदान केंद्रे ३०९ असून त्यापैकी सात सहायक मतदान केंद्रे आहेत. याठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष आणि दहा टक्के राखीव असे एकूण १६६९ आहेत. त्यात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक, दोन आणि तीन हे प्रत्येकी ३४० आणि शिपाई ३०९ इतके आहेत. कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघात३४३ केंद्रांवर मतदान होणार आहे. या मतदारसंघांत संवेदनशील मतदानकेंद्रे जरी घोषित केली नसली तरी येथे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांत टोकाची ईर्षा पाहावयास मिळत असल्याने बहुतांश केंद्रांवर पोलीस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. पन्हाळा, गगनबावडा व करवीर तालुक्यांतील गावे यांचा करवीर विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला आहे. त्याची भौगोलिक परिस्थिती काहीशी वेगळी आहे. या भागात वाड्या-वस्त्यांचा समावेश अधिक असल्याने मतदानकेंद्रांची संख्याही अधिक आहे. चंदगड, राधानगरीनंतर करवीर मतदारसंघातील मतदानकेंद्रांची संख्या आहे. करवीरमध्ये ३४३ केंद्रांसह पाच सहायक मतदान केंद्रेही सक्रिय केली आहेत. गेल्या पाच वर्षांत करवीरमध्ये ३१ हजार ६३२ नवीन मतदार नोंदणी झालेली आहे. गेल्या वेळेला सात उमेदवार रिंगणात होते. आता आठ उमेदवार नशीब अजमावत आहेत; पण खरी लढत पारंपरिक गटांतच होत आहे. गेल्या वेळेला २ लाख ५७ हजार ८६६ पैकी २ लाख १५ हजार ५९८ मतदान झाले होते.गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा ‘करवीर’मध्ये तब्बल ३१ हजार ६३२ मतदान वाढले आहे. हे मतदान तरुणांचे असल्याने ते कोणाच्या पारड्यात पडते यावरच या मतदारसंघातील निकालाचे चित्र अवलंबून आहे. गेल्या वेळेला राज्यात सर्वाधिक महिलांचे मतदान याच मतदारसंघात झाले होते. राखीव दल, कर्नाटक, मुंबई पोलीसही दाखल‘बेल’ कंपनीच्या यंत्रांचा वापर शासकीय यंत्रणा सज्जशासकीय यंत्रणा सज्जशंभरवर जवान तैनातनिवडणूक आयोगाचे विशेष लक्षदहा मतदार केंद्रे उपद्रवीजिल्ह्यात ३७ भरारी पथकांची नियुक्ती. ३३ स्थिर सर्वेक्षण पथकांची नियुक्ती. ३२ व्हिडिओ सर्वेक्षण पथकांची नियुक्ती. १० व्हिडिओ पाहणी पथके .१० लेखापथके कार्यरत .तक्रार नोंदविण्यासाठी १० कॉलसेंटर.जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीवेळी जेवढी मतदारसंख्या होती, त्यामध्ये नव्याने आणखी १२ हजार ७७४ मतदारांची वाढ झाली आहे.जिल्ह्यातील १० मतदारसंघांत मिळून ३१९० मतदान केंद्रे असणार आहेत.सर्वाधिक ३९६ मतदान केंद्रे राधानगरी मतदारसंघात, कमी २४६ केंदे्र ही इचलकरंजी मतदारसंघात आहेत.