शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कोल्हापुरात सामाजिक जाणिवेची वीण घट्ट; ४४ हजार मूर्ती, १०० टन निर्माल्य दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:30 IST

कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची साद घालत सोमवारी (दि. १७) गणेश विसर्जनावेळी शहर परिसरात ४४ हजार २२६ विसर्जित गणेशमूर्ती तसेच सुमारे १०० टनांहून अधिक निर्माल्य महानगरपालिकेच्या स्वाधीन करून शहरवासीयांनी सामाजिक जाणिवेची वीण घट्ट केली. शहरातील पंचगंगा नदी तसेच महत्त्वाचे तलाव यांचे संवर्धन करण्यात शहरवासीयांनी मोलाचे सहकार्य केले. दरम्यान, महापालिका कर्मचारी तसेच ...

कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची साद घालत सोमवारी (दि. १७) गणेश विसर्जनावेळी शहर परिसरात ४४ हजार २२६ विसर्जित गणेशमूर्ती तसेच सुमारे १०० टनांहून अधिक निर्माल्य महानगरपालिकेच्या स्वाधीन करून शहरवासीयांनी सामाजिक जाणिवेची वीण घट्ट केली. शहरातील पंचगंगा नदी तसेच महत्त्वाचे तलाव यांचे संवर्धन करण्यात शहरवासीयांनी मोलाचे सहकार्य केले. दरम्यान, महापालिका कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी विसर्जनस्थळांचा परिसर स्वच्छ केला.महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नागरिकांना गणेशोत्सव पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पंचगंगा नदी, तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने तात्पुरते गणेश विसर्जन कुंड, मूर्ती जमा करण्यासाठी स्टेज, काहिली व निर्माल्य कुंडांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.गणेशमूर्ती, निर्माल्य व पूजासाहित्य विसर्जन करण्यासाठी इराणी खण, तांबट कमान येथील कुंड, मोहिते खण, गंजीवली खण, रामानंदनगर चौपाटी, संध्यामठ, राजे संभाजीनगर तरुण मंडळ, पदपथ उद्यान, पतौडी खण, सरदार तालीम, संभाजीनगर, साळोखेनगर, तलाव परिसर, पंचगंगा नदीघाट परिसर, प्रायव्हेट हायस्कूल पटांगण, स्वामी समर्थ मंदिर, नारायणदास मठ, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, सायबर चौक व राजाराम गार्डन, राजाराम बंधारा- कसबा बावडा, नर्सरी उद्यान- रुईकर कॉलनी, बापट कॅम्प- नदी परिसर, मसुटे मळा, महावीर गार्डन, इ. ठिकाणी कृत्रिम कुंड, काहिली, निर्माल्यकुंड, आदींची व्यवस्था केली होती. या ठिकाणी नागरिकांनी गणेशमूर्ती व निर्माल्याचे विसर्जन करून महापालिकेच्या या आवाहनास चांगला प्रतिसाद दिला.शहरवासीयांनी दान केलेल्या गणेशमूर्ती एकत्र करून सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून नेऊन इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. नागरिकांनी दान केलेले १०० टन निर्माल्य गोळा करण्यात आले. हे निर्माल्य वाशी येथे खत तयार करण्यासाठी ‘एकटी’ संस्थेस महापालिकेच्या वतीने पोहोच केले.विसर्जनस्थळांची स्वच्छतामंगळवारी सकाळी महानगरपालिका आरोग्य विभागाने तातडीने विसर्जनस्थळ परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली. सकाळी साडेआठ वाजण्यापूर्वी सर्व परिसर चकाचक झाले होते. त्याची छायाचित्रे महानगरपालिकेने आयुक्तांना अधिकाऱ्यांच्या अ‍ॅपवर अपलोड केली आणि मगच नेहमीच्या प्रभागातील कचरा उठावाचे काम सुरू झाले. सुमारे ३00 हून अधिक स्वच्छता कर्मचारी, तसेच काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही यात योगदान दिले.