शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

कोल्हापूर शिवाजी पेठेतील ‘पद्माराजे’त युद्धकला केंद्र नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:55 AM

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानात युद्धकला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा घाट घातला जात असून, त्याला आमचा विरोधच राहील. उद्यान हे उद्यानच राहू दे. उलट मिळणारा निधी हा उद्यानाच्या विकासावर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन राजे संभाजी तरुण मंडळाच्यावतीने गुरुवारी महानगरपालिका महापौर हसिना फरास व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात ...

ठळक मुद्देउद्यानप्रश्नी आयुक्तांना निवेदन: शिवाजी पेठेतील नागरिकांचे म्हणणे ऐकूनच निर्णय

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानात युद्धकला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा घाट घातला जात असून, त्याला आमचा विरोधच राहील. उद्यान हे उद्यानच राहू दे. उलट मिळणारा निधी हा उद्यानाच्या विकासावर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन राजे संभाजी तरुण मंडळाच्यावतीने गुरुवारी महानगरपालिका महापौर हसिना फरास व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले.

मोठ्या संख्येने महिला व लहान मुलांचा समावेश असलेले शिवाजी पेठेतील नागरिकांचे एक शिष्टमंडळ गुरुवारी सायंकाळी महानगरपालिका आयुक्त चौधरी यांना भेटले. त्यानंतर त्यांनी महापौर फरास यांचीही स्वतंत्र भेट घेतली. लहान मुलांनी निवेदन व गुलाबपुष्प आयुक्तांना दिले.रंकाळा तलावाला लागून असलेले पद्माराजे उद्यान गेल्या ७२ वर्षांपासून आहे. तलावावर होणाºया स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांची घरे या उद्यानात आहेत. बागेत जुने वृक्ष पर्यावरणाचा समतोल साधत आहेत. भागातील नागरिकांना फिरण्यासाठी उद्यानाचा उपयोग होतो. उद्यानाचा वापर हास्य क्लब, योगासने, ओपन जीम याबरोबरच खेळण्यासाठी लहान मुले वापर करतात.

नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने हे उद्यान जपणे जरुरीचे आहे. उद्यानाच्या स्वरूपात बदल करून युद्धकला प्रशिक्षण केंद्र उभारणे म्हणजे शांततामय जीवनाशी प्रतारणा केल्यासारखे आहे. नवीन उद्याने जागेअभावी व निधीअभावी होऊ शकत नाहीत, किमान जुनी उद्याने तरी राहू देत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, अशी ग्वाही चौधरी यांनी शिष्टमंडळाला दिली.

शिष्टमंडळात माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, विकास जाधव, दिलीप कदम, शरद तांबट, रसिका तांबट, मीनाक्षी सरनाईक, शकुंतला सरनाईक, आनंदीबाई चव्हाण, सुप्रिया सासने, प्रियांका सासने, माधुरी चव्हाण, शीला हराळे, अर्चना पोवार, सविता जाधव, माधुरी तांबट, दीपा गवळी, सारिका सुतार, मीना सासने, अश्विनी सासने, जयश्री चव्हाण, मुरलीधर चव्हाण, सुवर्णा चव्हाण, संपदा पाटील, दीपा जाधव, मिलिंद चव्हाण, सोनाबाई पोवार, वैशाली जाधव यांचा समावेश होता.कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानाची जपणूक केली जावी, अशा मागणीचे निवेदन गुलाबपुष्पासह महिला व लहान मुलांनी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना गुरुवारी दिले.