शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी ‘रस्त्यावर’

By admin | Updated: December 12, 2014 23:43 IST

संजय घोडावत : घोडावत इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी मंगळवारी करणार आंदोलन; बिल्डो प्रदर्शनास प्रारंभ

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगलीतून सरकारला २०० कोटी रुपयांचा रोड टॅक्स दिला जातो. मात्र, त्याच्या दहा टक्केदेखील रक्कम रस्त्यांवर खर्च होत नाही. या रस्त्याचे चौपदरीकरण रखडल्यामुळे अपघात होऊन अनेकांना जिवाला मुकावे लागत आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. १६) घोडावत इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी रस्त्यावर उतरून अंकली पुलाजवळ आंदोलन करणार असून, यात सहभागी व्हावे, असे आवाहन उद्योगपती संजय घोडावत यांनी आज, शुक्रवारी येथे केले. येथील मेरी वेदर मैदानावर असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्सच्या ‘बिल्डो २०१४’ या बांधकामविषयक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महालक्ष्मी स्टीलचे जितेंद्र गांधी प्रमुख उपस्थित होते.घोडावत म्हणाले, कोल्हापूरला मागितल्याशिवाय काही मिळत नाही. विमानतळ बंद असून, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सरकारची कसलीही मदत नसल्याने येथील विकास खुंटला आहे. कामाची मुदत उलटली, तरी कोल्हापूर-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण झालेले नाही. एक सामाजिक प्रश्न म्हणून घोडावत इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी मंगळवारी आंदोलन करणार आहेत.‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष गिरीश रायबागे, अर्थमूव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष भैयासाहेब घोरपडे, ‘ट्रीपल आय’चे नवीन लाड, ‘आयआयए’चे निशिकांत गोरुले, अनंत खासबारदार, बलराम महाजन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुधीर राऊत, अभिजित जाधव, मधुकर पवार, शिवाजी पाटील, उमेश कुंभार, कालिका स्टीलचे प्रवीण शर्मा, आदी उपस्थित होते. संदीप घाटगे यांनी स्वागत, तर मुग्धा गोरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)कोल्हापुरात शुक्रवारी असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्सच्या ‘बिल्डो २०१४’ या बांधकामविषयक प्रदर्शनाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना उद्योगपती संजय घोडावत. शेजारी डावीकडून अभिजित जाधव, संदीप घाटगे, मिलिंद पाटील, जितेंद्र गांधी, मधुकर पवार, सुधीर राऊत, रवी पाटील उपस्थित होते.