शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरला तीन दिवसांत ४,९०० मिलिमीटर पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कमी वेळात जास्त पाऊस पडल्यानेच जिल्ह्याला महापुराचा विळखा पडला, हा प्राथमिक अंदाज पावसाची सविस्तर आकडेवारी आल्यानंतर ...

कोल्हापूर : कमी वेळात जास्त पाऊस पडल्यानेच जिल्ह्याला महापुराचा विळखा पडला, हा प्राथमिक अंदाज पावसाची सविस्तर आकडेवारी आल्यानंतर खरा ठरला आहे. अवघ्या तीनच दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात ४ हजार ९०० मिलिमीटर पाऊस कोसळल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. यातही २१ ते २६ या पाच दिवसांनीच संपूर्ण जुलै महिन्याची सरासरी ओलांडून दिली, हे त्याहून अधिक गंभीर.

जिल्ह्याची जुलै महिन्याची पावसाची सर्वसाधारण सरासरी ६८५ मिलिमीटर आहे; पण २० जुलैपर्यंत यातील केवळ १८१ मिलिमीटर पाऊस झाला होता. यानंतर २१ पासून पावसाने हळूहळू जोर धरण्यास सुरुवात केली. २२ पासून एकसारखा रपाटा सुरू झाला आणि २३ पासून पूरस्थिती निर्माण झाली. २३ आणि २४ या दोन दिवशी तर ढगफुटीसारखा पाऊस जिल्हाभर कोसळला. मोग्यासारख्या कोसळणाऱ्या या पावसाने एका रात्रीत महापुराने जिल्ह्याला कवेत घेतले. २५ पासून जोर ओसरल्याने जिल्ह्याने सुटकेचा नि:श्वास सोडला; पण यामुळे जिल्ह्यातील बदललेल्या पावसाच्या पॅटर्नची चर्चा पुन्हा सुरू झाली.

गेल्या वर्षीदेखील संपूर्ण जुलै महिना पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर अवघ्या आठवडाभराच्या पावसाने पूर आणला होता. २०१९ मध्येदेखील अशीच परिस्थिती राहिली. २५ जुलैनंतर पावसाला सुरुवात होऊन ५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात प्रलयंकारी महापूर आला होता. त्याची तुलना शंभर वर्षांत आला नाही असा महापूर, अशी केली गेली. त्याचीच पुनरावृत्ती यावर्षीदेखील झाली आणि २०१९ पेक्षाही भयंकर पुराचा सामना करावा लागला. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केवळ तीन दिवसांत वर्षभराच्या पावसाचा अनुभव येथील जनतेने घेतला.

जुलैच्या तीन दिवसांतील पाऊस (मि.मी.)

तालुका २२ जुलै २३ जुलै २४ जुलै एकूण

हातकणंगले ६० ७१ १३० २६१

शिरोळ ३० २९ ८२ १४१

पन्हाळा १३३ २०९ १६४ ५०६

शाहूवाडी १७८ २९६ १४३ ६१७

राधानगरी १०८ ३९८ ७२ ५७८

गगनबावडा १०३ २२७ ३३७ ६६७

करवीर ११० १८२ १६९ ४६१

कागल ७९ २१४ ११२ ४०५

गडहिंग्लज ४४ २१० ९० ३४४

भुदरगड १०७ ३३७ ६८ ५१२

आजरा ७१ २५५ ६९ ३९५

चंदगड ९३ २१२ ११४ ४१९

चौकट

जुलैमधील सरासरी पाऊस पडलेला पाऊस टक्केवारी

हातकणंगले १७३ ३६४ २०९

शिरोळ ११७ २१९ १८६

पन्हाळा ५८७ ७४१ १२६

राधानगरी १४५५ १०५२ ७२

गगनबावडा १९२९ १५३४ ८२

करवीर ३१७ ६५१ २०५

कागल २४६ ६१८ २५१

गडहिंग्लज २८९ ५८८ २०३

भुदरगड ५२६ ९२१ १७४

आजरा ७५० ७०३ ९३

चंदगड ६८५ ६९३ १०१

चौकट

गेल्या वर्षी जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठी ५० ते ६० टक्के होता. यावर्षी जुलै संपण्याआधीच धरणे तुडुंब भरली. याला अपवाद फक्त वारणा आणि दूधगंगेचा आहे. त्यांचा साठाही ९० टक्क्यांच्या घरात आहे; पण जास्त पाणी साठवणे धोक्याचे असल्याने दाब नियंत्रणासाठी धरणातून विसर्ग सुरू ठेवला आहे. राधानगरी धरण तर यावर्षी २२ ला ५९ टक्के भरले होते, २४ ला शंभर टक्के भरून २५ पासून स्वयंचलित दरवाजातून विसर्गही सुरू झाला.

चौकट

पडलेला पाऊस पाहिला तर गगनबावडा, आजरा, राधानगरी या पावसाचे आगर असलेल्या तालुक्यात कमी, तर कागल, करवीर, गडहिंग्लजमध्ये जास्त पाऊस दिसत आहे. येथे सरासरी २०० टक्के पाऊस आहे.