शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग होणार तीनपदरी ?

By admin | Updated: April 28, 2015 00:31 IST

राष्ट्रीय महामार्ग विभाग : १२ कोटी ४० लाखांची कामे मंजूर; मलकापूर पुलाचे रुंदीकरण; घाटरस्त्याचीही दुरुस्ती

शेखर धोंगडे - कोल्हापूर --राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ अंतर्गत सोलापूर-कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील विविध कामांसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने १२ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने वर्षभर रेंगाळलेल्या या महामार्गाच्या कामाला गती येणार आहे. यातील कोल्हापूर ते रत्नागिरी हा महामार्ग तिपदरीच्या दृष्टीने सर्व्हे करून प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील नागजपासून कोल्हापूर-रत्नागिरीपर्यंतचा महामार्ग गेल्यावर्षी पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अखत्यारित देण्यात आला होता. हा रस्ता पुणे विभागाच्या नियंत्रणाखाली गेला होता. त्यामुळे या महामार्गावर भौगोलिक तसेच प्रशासकीयदृष्ट्या देखरेख व दुरुस्ती तसेच सनियंत्रण करणे अत्यंत गैरसोयीचे ठरत होते. परिणामी कामांना विलंब होत होता. सातत्याने अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या या विभागाला अनेकदा नागरिकांच्या तक्रारीला सामोरे जावे लागत होते.मात्र, २६ नोव्हेंबर २०१४ च्या नव्या शासन आदेशानुसार पुन्हा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग विभागाला हा मार्ग (लांबी) जोडण्यात आला. शिवाय सोलापूर-कोल्हापूर-रत्नागिरी असे अंतरही वाढविण्यात आले. याचबरोबरच स्वतंत्र अधिकार देण्यात आले. मार्च-एप्रिलमध्ये १२.४० कोटींची नवी कामेही मंजूर होऊन आली आहेत. त्यामुळे रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर मार्गावरील अनेक कामांना गती येणार आहे.कोल्हापूर-रत्नागिरी हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे रेंगाळेलेली कामे आता जलदगतीने करता येतील. याचबरोबर कोल्हापूर येथून या मार्गावर देखरेख, सनियंत्रण करणे शक्य होईल, तसेच कामाचा दर्जा सांभाळता येईल.- आर. के. बामणे,--कार्यकारी अभियंता  ,,राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर कोल्हापूर-मलकापूर-बांबवडेला ‘बायपास’कोल्हापूर शहर, मलकापूर तसेच बांबवडे शहरातून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जात असल्याने अनेकदा याचा ताण या शहरांना होत आहे. त्यामुळे शहराला पर्यायी मार्ग व वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी कोल्हापूर, मलकापूर, बांबवडे या रस्त्यांना बायपास म्हणजेच वळणरस्ता काढण्याच्या दृष्टीने या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.मार्च-एप्रिलमध्ये मंजूर झालेली कामे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर नगरपरिषदेच्या हद्दीतील अरुंद पुलाच्या रुंदीकरणासाठी तीन कोटी २१ लाख ६ हजार रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच हे काम हाती घेतले जाणार आहे. या पुलाचे रुंदीकरण झाल्यास मलकापूर शहरावर पडणारा वाहतुकीचा ताण कमी होईल. कोल्हापूर शहरापासून पंचगंगा नदीच्या पुढे केर्ली ते वडणगे येथे दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा फुगवटा वाढल्याने कोल्हापूर-रत्नागिरी हा मार्ग बंद पडत असतो.यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून धापा ड्रेनेजची दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी ७० लाख ४३ हजार रुपये मंजूर झाले आहेत. आंबा ते वारुळ अशा सुमारे १० किलोमीटर मार्गाच्या रुंदीकरण, डांबरीकरण तसेच अन्य दुरुस्तीसाठी चार कोटी ६१ लाख ४४ हजार रुपये मंजूर झाले आहेत.मिरजजवळील भोसे येथे नवीन पुलासाठी ७० लाख ४३ हजार, तर याच मार्गावर आवश्यक तेथे नव्या मोऱ्या बांधण्यासाठी एक कोटी २१ लाख ९२ हजार रुपयांची तरतूद केली आहे.