शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पब्लिक स्कूलचे ‘स्काऊट गाईड्स’ निघाले लंडनला

By admin | Updated: July 29, 2016 00:33 IST

कोल्हापूर स्काऊटकडून सत्कार : चार्नवूड येथे होणाऱ्या जागतिक जांबोरीसाठी निवड

कोल्हापूर : लंडनमधील चार्नवूड येथे दि. २९ जुलै ते ७ आॅगस्टदरम्यान होणाऱ्या जागतिक स्काऊड गाईड जांबोरीसाठी निवड झालेला कोल्हापूर पब्लिक स्कूलचा संघ आज, शुक्र वारी लंडनला रवाना होणार आहे. यानिमित्ताने त्यांचा जिल्हा स्काऊट चिटणीस डॉ. व्ही. एस. पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोल्हापूर भारत स्काऊटस् आणि गाईड्सतर्फे बुधवारी विद्यार्थ्यांचा सत्कार व शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा प्रशिक्षक बी. ए. पोटे, जिल्हा संघटक विक्रांत देशपांडे, तावडे फौंडेशनचे किशोर तावडे, आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. पोवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय पातळीवरील एका मोठ्या समारंभासाठी कोल्हापूरच्या संघाची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या व्यासपीठाद्वारे आपली संस्कृती जगासमोर मांडण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे.यावर्षी सन २०१६ ची जांबोरी चार्नवूड, लंडन येथे होत आहे. भारतातून ७२ स्काऊटस् गाईड्स व लिडर्स सहभागी होणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या ७ स्काऊटस, ४ गाईड्स व २ लिडर्सना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या जांबोरीसाठी जिल्हा गाईड कमिशनर शोभा तावडे या ‘इंडियन काँटिजंट लिडर’ म्हणून सहभागी होत आहेत. यापूर्वी त्यांनी आॅस्ट्रेलिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्काऊट वर्कशॉपमध्ये सहभागी झाल्या होत्या. याच कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्काऊट गाईड कार्यालयाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. (प्रतिनिधी)