शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

कोल्हापूर पोलिसांकडून आरोपींची पाठराखण

By admin | Updated: May 31, 2016 01:19 IST

विदेशी सहल फसवणूक : गुन्हा दाखल होऊनही निरीक्षकांचेच अज्ञान

कोल्हापूर : विदेशी सहल प्रकरणात जुना राजवाडा पोलिसांकडून तक्रारदारासच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करून आरोपीची मात्र पाठराखण सुरू असल्याचा अनुभव संबंधितांना येत आहे. याप्रकरणी राजश्री राजकुमार गाडगीळ यांनी बुधवारी (दि. २५) सायंकाळी पावणेपाच वाजता एफआयआर नोंदविला आहे; परंतु त्याची शनिवार (दि. २८) रात्रीपर्यंतही पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांना काहीच माहीत नव्हती. असा कोणताही गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले होते.घडले ते असे : कोल्हापूर व बेळगांवचे प्रत्येकी चौघे, ठाणे व पुण्यातील प्रत्येकी दोघे अशा बारा जणांनी कोल्हापुरातील राज टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्समार्फत युरोप दौऱ्याचे बुकिंग केले. राज टुर्सने मुंबईतील बांद्रा परिसरातील वर्ल्ड वाईड डीएमसी या ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत या विदेश दौऱ्याची नोंदणी केली. त्यासाठी त्यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या एक लाख रुपयांचा धनादेश २१ एप्रिलला दिला. दुसरा धनादेश १७ लाख ६३ हजार ४८० रुपयांचा १७ मे रोजी दिला. १९९९ युरो डॉलर्स हा या दौऱ्याचा खर्च होता. त्यानुसार पैसे भरल्यानंतर त्यापुढील सगळी व्यवस्था वर्ल्ड वाईड टुर्स कंपनीने करायला हवी होती; परंतु त्यांच्या भोंगळ कारभाराचा फटका पर्यटकांना बसला. ही टूर दि. १७ मे ते ५ जून अशी आहे. मुळात ती दि. १३ मे रोजी जाणार होती परंतु व्हिसा उशिरा सबमिट केल्यामुळे ती लांबणीवर पडली. वर्ल्ड वाईड कंपनीने प्रवाशांना त्यांची व्हौचर्सही घाईघाईत विमानतळावर जाताना टॅक्सीमध्ये दिली तेथूनच त्यांच्या गैरसोयीची सुरुवात झाली. प्रत्यक्षात युरोपमध्ये पोहोचल्यावर टोल-टॅक्सचे पैसे भरा, अशी मागणी केली. झुरिकला पोहोचल्यावर त्यांच्याकडे तब्बल ९ लाख रुपयांची मागणी केल्यावर या पर्यटकांच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढे पैसे आम्ही येथे कोठून आणणार, अशी विचारणा त्यांनी केली. पैसे द्या नाही तर आम्हाला पुढची सर्व्हिस देता येणार नाही, असे सांगू लागल्यावर त्यांनी ही माहिती राज टूर्सच्या संचालकांना सांगितली. त्यानुसार राजश्री गाडगीळ यांनी जुना राजवाडा पोलिसांत वर्ल्ड वाईड डीएमसी कंपनीच्या जिग्ना पटेल यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली. त्यानुसार संशयित जिग्ना पटेल यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन कोल्हापुरात आणले. त्यांना त्यांच्या वातानुकुलित वाहनांतून आणण्यात आले. ‘सरकारचे जावई’ असल्यासारखी वागणूक देण्यात आल्याची तक्रार गाडगीळ यांच्याकडून करण्यात आली. त्यावर तपास अधिकारी ए. व्ही. म्हस्के यांनी त्यांनाच ‘आम्हाला अक्कल शिकवू नका, तपास कसा करायचा हे आम्हास समजते,’ असे बजावले. या प्रकरणात एवढ्या घडामोडी झाल्या असतानाही त्यावर पडदा टाकण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांना शनिवारीच (२८ मे) पत्रकारांनी विचारले असता त्यांनी अशी कोणताही घटना पोलिसांत नोंद नसल्याचे सांगून टाकले. गंमत म्हणजे म्हणजे त्यांनीच २५ मे रोजी राजश्री गाडगीळ यांचा अर्ज पोलिसांत दाखल (आ. क्रमांक १७०३/२०१५) करून घेतला आहे.आता याप्रकरणी संबंधित पर्यटक दि. ५ जूनला कोल्हापुरात आल्यावरच जाबजबाब घेऊ, असे तपास अधिकारी फौजदार ए. व्ही. म्हस्के सोमवारी सांगत होते. तोपर्यंत सायंकाळी त्यांची राजारामपुरी पोलिस ठाण्यात बदली झाली. (प्रतिनिधी)सहल अर्धवट सोडून आज भारताकडे प्रयाणदरम्यान, हे पर्यटक सोमवारी पॅरिसमध्ये होते. हॉटेलमध्ये राहण्याची सोय सोडून त्यांच्या सर्व सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. इथे उपाशीपोटी राहण्यापेक्षा मुंबईला परत गेलेले बरे या मानसिकतेत हे पर्यटक आले होते. राज गाडगीळ यांच्याकडे त्यांनी तसा आग्रह धरला. अखेर सहल अर्धवट सोडून हे पर्यटक आज, मंगळवारी विमानाने मायदेशी प्रयाण करणार असल्याचे त्यातील एका पर्यटकाने ‘लोकमत’ला सांगितले. उद्या, बुधवारी ते मुंबईत पोहोचतील, असेही या पर्यटकाने सांगितले.