शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात रोहित्रे जळण्याचे प्रमाणे केवळ चार टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:19 IST

‘महावितरण’कडून रोहित्रांच्या माध्यमातून कृषी पंपांसाठी वीजपुरवठा केला जाताे. एकेका रोहित्रांवर शंभरांभर वीज कनेक्शन दिली जातात. अतिरिक्त दाब येऊन रोहित्रे ...

‘महावितरण’कडून रोहित्रांच्या माध्यमातून कृषी पंपांसाठी वीजपुरवठा केला जाताे. एकेका रोहित्रांवर शंभरांभर वीज कनेक्शन दिली जातात. अतिरिक्त दाब येऊन रोहित्रे जळतात, असा शोध लावत राज्यातील मागील फडणवीस सरकारने स्वतंत्र रोहित्रांचा वापर करणे बंधनकारक केले. त्यामुळे ‘महावितरण’कडे यंत्रणा कमी पडल्याने वीज जोडण्या प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून आताच्या ठाकरे सरकारने स्वतंत्र रोहित्राची अट काढून टाकून पूर्वीप्रमाणेच एकाच रोहित्रांवर अनेक जोडण्या देण्याचे धोरण हाती घेतले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता हा हरितपट्टा म्हणून ओळखला जात असल्याने येथे शेतकऱ्यांसह ‘महावितरण’ची यंत्रणाही कायम तत्पर असते. अतिरिक्त दाब येऊ नये यासाठी भारनियमनाचे नियोजन केलेले असते, तरीदेखील काहीवेळा राेहित्रात बिघाड होण्याच्या घटना घडतात. बिघाड झाला तर शेतकऱ्यांकडून लगेच ‘महावितरण’कडे दुरुस्तीसाठी तगादा लावला जातो. ‘महावितरण’ची यंत्रणाही लगेच कामाला लागते. किमान दोन दिवस आणि जास्तीत जास्त चार दिवस एवढ्या कालावधीत वीजप्रवाह पुन्हा सुरळीत केला जाताे. त्यामुळे केवळ रोहित्र जळाले म्हणून पिके वाळल्याची उदाहरणे जिल्ह्यात आढळत नाहीत.

चौकट ०१

नादुरुस्त १०६०पैकी १०४४ तातडीने दुरुस्त

जिल्ह्यात ‘महावितरण’कडे २६ हजार ५१७ रोहित्रे सध्या कार्यान्वित आहेत. त्यापैकी १ एप्रिल ते आजअखेरपर्यंत १ हजार ६० रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या. त्यातील १०४४ रोहित्रांची तातडीने दुरुस्तीही करण्यात आली. आता केवळ १६ राेहित्रे दुरुस्तीचे काम शिल्लक आहे. ते देखील आठवडाभरात पूर्ण करण्याचे नियोजन सुरू आहे.

चौकट ०२

जिल्ह्यात कृषी ग्राहकसंख्या : १ लाख ४७ हजार ४९३

एकूण ग्राहकांपैकी टक्केवारी : १३.९ टक्के

प्रतिक्रिया

शेतकऱ्यांना एक रुपयाचाही खर्च लागू नये, पिके पाण्याअभावी जळू नयेत यासाठी रोहित्रे जळाल्यापासून ते दुरुस्तीपर्यंत यंत्रणा युद्धपातळीवर लावली जाते. दुरुस्तीमध्ये ऑईलची उपलब्धता हा मोठा घटक असतो, पण ते कमी पडू नये याची आधीच दक्षता घेतली जाते.

- किशोर खोबरे, जनसंपर्क अधिकारी, कोल्हापूर परिमंडळ, महावितरण.