शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पालिकेने ‘अ‍ॅस्ट्रोटर्फ’चा प्रस्ताव दिल्यास केंद्राकडे पाठवू

By admin | Updated: July 22, 2016 00:53 IST

नरेंद्र सोपल : पुणे येथे झालेल्या चर्चेत आश्वासन

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने ‘खेलो इंडिया’ या योजनेतून अ‍ॅस्ट्रोटर्फसाठी प्रस्ताव पाठविल्यास तो तत्काळ मंजूर करून केंद्राकडे पाठविण्यात येईल. त्यासाठी विशेष प्रयत्नही करू, असे आश्वासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे या कार्यालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल यांनी दिले. सोपल यांची ‘स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडिया’च्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा हॉकी संघटनेच्यावतीने बालेवाडी (पुणे) येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी झालेल्या चर्चेत ते बोलत होते. सोपल म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला हॉकी खेळाची परंपरा आहे. शालेय व महाविद्यालयीन स्तरांवर खेळणाऱ्या मुला-मुलींच्या संघाने राज्य व राष्ट्रीय पातळ्यांवर गेली अनेक वर्षे देदीप्यमान कामगिरी केली आहे, याची मला कल्पना आहे. त्यामुळे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय हॉकीपटू तयार होण्यासाठी टर्फ आवश्यक आहे. त्याचा फायदा कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील खेळाडूंनाही होईल. कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी केंद्र शासनाने नव्याने सर्व खेळांसाठी मंजूर केलेल्या ‘खेलो इंडिया’ या योजनेतून ५.५० कोटी मंजूर होऊ शकतात; पण यात दरवर्षी दोनच खेळांचे प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्याची तरतूद आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिका व जिल्हा हॉकी संघटनेच्या वतीने टर्फ बसविण्याचा प्रस्ताव तत्काळ पाठविल्यास त्याला आपल्या कार्यालयाची त्वरित मंजुरी देऊन हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवू, असे आश्वासन सोपल यांनी दिले.यावेळी जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष विजय साळोखे-सरदार, सचिव सुदाम तोरस्कर, मोहन भांडवले, ताहिर शेख, आदी उपस्थित होते.