शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या आमदारांचा विधिमंडळाबाहेर आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:50 IST

कोल्हापूर : मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी विधानभवन (मुंबई) येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील शिवसेनेच्या ...

कोल्हापूर : मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी विधानभवन (मुंबई) येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाबाहेर आवाज घुमविला.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षण त्वरित मिळावे, असे फलक गळ्यात अडकविलेले शिवसेनेचे आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील-सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर यांनी जोरदार घोषणाबाजी करीत विधानभवनात प्रवेश केला.मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता राज्यभरात ५९ हून अधिक मूक व नंतर ठोक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना करून स्वयंस्पष्ट अहवाल करण्याची विनंती केली. यानुसार आयोगाने याबाबतचा अहवाल १५ नोव्हेंबरला मुख्य सचिवांकडे सादर केला. यावर राज्य सरकारने हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवून स्वतंत्र ‘एसईबीसी’ प्रवर्गातून आरक्षण जाहीर केले आहे. हे आरक्षण राज्यात लवकरात लवकर लागू करून मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी यावेळी या सर्व आमदारांनी या अधिवेशनावेळी केली.