शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर मार्केटमध्ये कांद्याने चाळिशी गाठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 17:33 IST

कोल्हापूर : गेले आठ-दहा दिवस कांद्याच्या दरात वाढ झाली असून, या आठवड्यात किरकोळ बाजारात कांद्याने चाळिशीचा टप्पा पार केला आहे. आवक मर्यादित असली तरी मागणी वाढल्याने तेजी आली आहे. भाजीपाल्याच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींचे दरही स्थिर असून, सरकी तेलाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. घाऊक बाजारातील साखरेचा दर थोडा वाढला असला तरी त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर दिसत नाही.

ठळक मुद्देभाजीपाला स्थिर : घाऊक बाजारात साखरेच्या दरात वाढ या आठवड्यात कांद्याचे दर चांगलेच वधारले असून, दर चाळीस रुपयांपर्यंत पोहोचला आहे. (फोटो-०६०८२०१७-कोल-बाजार)(छाया : नसीर अत्तार)

कोल्हापूर : गेले आठ-दहा दिवस कांद्याच्या दरात वाढ झाली असून, या आठवड्यात किरकोळ बाजारात कांद्याने चाळिशीचा टप्पा पार केला आहे. आवक मर्यादित असली तरी मागणी वाढल्याने तेजी आली आहे. भाजीपाल्याच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींचे दरही स्थिर असून, सरकी तेलाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. घाऊक बाजारातील साखरेचा दर थोडा वाढला असला तरी त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर दिसत नाही.

कांद्याचे उत्पादन वाढल्याने गेले वर्षभर घाऊक बाजारात सरासरी सात रुपये दर राहिला. अनेक वेळा आवक वाढल्याने दीड व दोन रुपये किलो दर होता; पण शेजारील राज्यात पावसामुळे कांद्याचे उत्पादन घटणार आहे, त्याचा परिणाम आतापासूनच बाजारपेठेवर दिसू लागला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या रोज १९ हजार कांदा पिशव्यांची आवक सुरू आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारातील दर सरासरी चौदा रुपये होता, आता तो २५ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही कांद्याचा दर ४० रुपयांपर्यंत आहे. बटाट्याची आवक व दरावर फारसा परिणाम झालेला नाही.

भाजीपाला मार्केटमध्ये कोबी, वांगी, टोमॅटो, ओली मिरची, ढब्बू, घेवडा, गवार, कारली, भेंडी, वरणाच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. काकडीची आवक वाढली असली तरी दर तेजीतच आहे. कोथिंबीरची आवक मंदावल्याने दर थोडा वाढला आहे. घाऊक बाजारात ५ रुपये पेंढी झाली आहे. मका कणीसची आवक कमी असल्याने दर तेजीत आहे. मेथी, पोकळा, पालक या पालेभाज्यांचे दर स्थिर असून, मेथीचा दर सरासरी पाच रुपये पेंढी आहे.

घाऊक बाजारात साखरेच्या दरात किलोमागे ५० पैशांची वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरातही थोडी वाढ झाली असून, किरकोळ दर ७८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तूरडाळ ७०, हरभरा डाळ ७५ व शाबू ८० रुपये किलोवर स्थिर आहे. फळ मार्केटमध्ये सफरचंदची आवक थोडी वाढली आहे. सिमला, चंदीगढ येथून आवक सुरू असून, २५ किलोचा बॉक्स १५०० ते २५०० रुपयांपर्यंत आहे.ओला वाटाणा कडाडलाओला वाटाण्याची आवक सुरू होऊन महिना झाला, त्यावेळी किरकोळ बाजारात १०० रुपयांपर्यंत दर राहिला. त्यानंतर हळूहळू दर कमी होऊन ६० रुपयांपर्यंत पोहोचला होता; पण या आठवड्यात वाटाण्याने एकदम उसळी घेतली असून, घाऊक बाजारात ६५ रुपयांवर दर पोहोचला आहे.

‘अंजीर’ची आवक वाढली

फळ मार्केट शांत असले तरी ‘अंजीर’ची आवक थोडी वाढली आहे. केरळ येथून आवक कोल्हापूर मार्केटमध्ये होत असून, ४० ते ७० रुपये किलोचा दर राहिला आहे.