शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महामॅरेथॉन तिसऱ्या पर्वाचे चंद्रकांत, सपना ठरले ‘सिकंदर ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 20:22 IST

कोल्हापूर : भल्या पहाटेची गुलाबी थंडी, ढोल-ताशे, लेझीम, पोलीस बँड, मर्दानी खेळ आणि आकाशात विविध रंगांची उधळण करणारी आतषबाजी, ...

ठळक मुद्दे‘महामॅरेथॉन’चा थरार ठरला कोल्हापूग्करांसाठी संस्मरणीय

कोल्हापूर : भल्या पहाटेची गुलाबी थंडी, ढोल-ताशे, लेझीम, पोलीस बँड, मर्दानी खेळ आणि आकाशात विविध रंगांची उधळण करणारी आतषबाजी, तीन वर्षांच्या नातवाबरोबरच ८० वर्षांच्या आजी-आजोबांचा गगनचुंबी आत्मविश्वास, तरुण, तरुणी, विद्यार्थी, दिव्यांग धावपटूंचा ओसंडून वाहणाºया उत्साही सहभागाला कोल्हापूरकरांनी पुष्पवृष्टी करून दिलेली दिलखुलास दाद, धावपटूंच्या सोबतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, डोळ्यांचे पारणे फेडणारे नीटनेटके नियोजन, अशा जोशपूर्ण वातावरणात रविवारी कोल्हापुरातील पोलीस मैदानावर पार पडलेल्या लोकमत समूह आयोजित महामॅरेथॉनमध्ये खुल्या गटातील २१ कि.मी. महामॅरेथॉन स्पर्धा कोल्हापूरच्याच चंद्रकांत मनवाडकर याने, तर उत्तर प्रदेशची सपना पटेल हिने जिंकली. चंद्रकांतने पुरूषांमध्ये २१ कि.मीचे अंतर १ तास १३ मिनिटे ५६ सेकंदांत पूर्ण केले. सपनाने महिलांमध्ये २१ कि.मी.चे अंतर १ तास ३० मिनिटे ५२ सेकंदांत पूर्ण केले.सुरुवातीला वॉर्मअप झाल्यानंतर ५.५० वाजता राष्ट्रगीत झाले. सहा वाजता २१ कि.मी.च्या खुल्या गटातील धावपटूंना गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, इंडोकाऊंटचे व्हाईस प्रेसिडेंट शैलेश सरनोबत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, एम.आय.टी. आर्ट अ‍ॅँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी (पुणे)चे कुलसचिव एस. के. माळी, इंडियन आॅयलचे वरिष्ठ व्यवस्थापक निशांत जारोंडे, क्युअर आॅनचे सागर निंगनुरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, लोकमत महामॅरेथॉनच्या हेड रुचिरा दर्डा, ‘लोकमत’ कोल्हापूरचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी ‘फ्लॅग आॅफ ’ केला आणि धावपटू आपल्या ध्येयाकडे चित्याच्या चपळाईने धावले