शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही मंत्र्यांकडून राजीनाम्याचे नाटक कोल्हापूर जनशक्ती : जनतेची फसवणूक करू नका

By admin | Updated: May 9, 2014 00:38 IST

कोल्हापूर : टोल रद्द न झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा मंत्र्यांनी दिला आहे. गेल्या चार वर्षांत जे केले नाही,

 कोल्हापूर : टोल रद्द न झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा मंत्र्यांनी दिला आहे. गेल्या चार वर्षांत जे केले नाही, ते या उरलेल्या दोन महिन्यांत, जे काही वजन वापरायचे ते वापरून टोल रद्द करा. उगाचच राजीनाम्याने नाटक करू नका. असे करून पुढील दोन महिन्यांसाठी जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन कोल्हापूर जनशक्तीच्या वतीने सुभाष वोरा व समीर नदाफ यांनी पत्रकाद्वारे केले आहे. टोलविरोधात गेली चार वर्षे जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. या काळात शासन आणि प्रशासनाने सातत्याने जनतेच्या विरोधी भूमिका घेऊन आय.आर.बी.ची तळी उचलली आहे. शासनाचे प्रतिनिधी या नात्याने कोल्हापुरातील दोन्ही मंत्र्यांना वेळोवेळी निवेदने देऊन जनतेने साकडे घातले. परंतु, चार वर्षे लाल दिव्याच्या गाडीत बसून मंत्रिपदाची ऐट मिरवणारे मंत्री केवळ तोंडदेखलेपणाने या आंदोलनाला सामोरे गेले आहेत. आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांना खोटे आश्वासन देऊन, टोल पंचगंगेत बुडवल्याचा दावा करून त्यांची दिशाभूल केली व आंदोलन मागे घ्यावयास लावले. सातत्याने जनतेबरोबर आहोत असे आश्वासन देऊन शासनाच्या निर्णयाची इमानेइतबारे अंमलबजावणी करणार्‍या मंत्र्यांना गेल्या चार वर्षांत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची उपरती कधी झाली नाही. परंतु, पुढील दोन महिन्यांनंतर राज्य विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने लाल दिवे उतरून गाड्या सरकारदरबारी जमा कराव्या लागणार आहेत. तेव्हा चार वर्षांत जे केले नाही, ते केवळ दोन महिन्यांकरिता करून जनतेसाठी इतके कष्ट घेऊ नका. कोल्हापुरातील मंत्र्यांनी ओठात एक व पोटात एक अशीच भूमिका घेतली आहे. चार वर्षे जनतेसाठी जे केले नाही, ते या दोन महिन्यांत राज्य सरकारकडे वापरून पहा; अन्यथा कोल्हापूरची जनता सार्वभौम आहे. येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये याचा काय घ्यायचा तो निर्णय जनताच घेईल, असे पत्रकात म्हटले आहे.