शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये ११ पर्यंत २५ टक्के मतदान, ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 13:29 IST

उत्साही वातावरणात कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतील मतदानाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. शहरासह ग्रामीण भागातील केंद्रांवर मतदारांचा रांगा लागल्या होत्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी २५ टक्के मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरु राहिली.

ठळक मुद्देचुरस शिगेला; मतदारांमध्येही उत्साहईव्हीएम बंद पडल्याच्या काही ठिकाणी तक्रारी केंद्रांवर रांगा, मतदानासाठी उत्तम व्यवस्था; तणावरहित वातावरण

कोल्हापूर : उत्साही वातावरणात कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतील मतदानाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. शहरासह ग्रामीण भागातील केंद्रांवर मतदारांचा रांगा लागल्या होत्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी २५ टक्के मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरु राहिली.गेल्या वीस दिवसांपासून कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात राष्ट्रवादी-काँग्रेस, शिवसेना-भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आदींमध्ये चुरशीने प्रचाराची रणधुमाळी रंगली. पदयात्रा, जाहीर सभा-मेळावे, रॅलीसह सोशल मिडियांवरुन प्रचार सुरु होता. तिसऱ्या टप्प्याअंतर्गत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात मंगळवारी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.

पावणेसात वाजल्यापासून शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर मतदारांचा रांगा लागल्या.आठनंतर केंद्रांवरील गर्दी वाढली. कॉलनी, अपार्टमेंटमधील अनेकजण एकत्रितपणे मतदानासाठी येत होते. केंद्रांवर महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २५ टक्के मतदान झाले. उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी मतदान करण्याकडे अनेकांचा कल राहिला.

मतदान केंद्रांबाहेर उमेदवारांच्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक थांबून होते. केंद्राच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. मतदान असल्याने शहर, उपनगरांतील बाजारपेठा, रस्त्यांवर शांतता दिसून आली.

‘आमचं ठरलयं’ आधीकोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघातील अनेक केंद्रांवर शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे बूथ फारसे दिसले नाहीत. परंतु सकाळी सात वाजल्यापासून ‘आमचं ठरलयं’ असे लिहिलेल्या टोप्या घालून कार्यकर्ते केंद्रांबाहेर थांबले होते. मतदानासाठी ते आवाहन करत होते.

 मतदानासाठी उत्तम व्यवस्था

ग्रामीण भागातील केंद्रांबाहेर मतदान केंद्रांबाहेर ग्रामपंचायतींनी मंडप उभारले होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांसाठी वाहनाची व्यवस्था केली होती. मतदान केंद्राच्या परिसरातील मदत कक्ष अनेकांसाठी उपयोगी ठरला. मतदान कक्ष आणि अन्य माहिती त्याठिकाणी जावून नागरिक घेत होते.

केंद्र परिसरात मोबाईलला बंदीमतदान केंद्र परिसरात मोबाईल, कॉर्डलेस फोन, वायरलेस घेवून जाण्यास बंदी होती. त्याबाबत पोलिसांंकडून मतदारांना सूचना देण्यात येत होत्या.

सकाळी सात ते नऊपर्यंतची मतदानाची आकडेवारीकोल्हापूर मतदारसंघचंदगड : ८.२१ टक्केराधानगरी : १०.२७ टक्केकागल : ९.९७ टक्केकोल्हापूर दक्षिण : १०.१९ टक्केकरवीर : १०.२५ टक्केकोल्हापूर उत्तर : ९.६८ टक्के

हातकणंगले मतदार संघशाहूवाडी : ९.३१ टक्केहातकणंगले : ९.४८ टक्केइचलकरंजी : ९.२७ टक्केशिरोळ : ९.२३ टक्केइस्लामपूर : ७.३१ टक्केशिराळा : ७.४० टक्के

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

  क्षेत्र                        टक्केवारी

  • शाहूवाडी    :      23.00%
  • हातकणंगले   :    25.50%
  • इंचलकरंजी  :      24.50%
  • शिरोळ    :          22.70%
  • इस्लामपूर    :     21.50%
  • शिराळा    :         20.50%

 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

क्षेत्र                          टक्केवारी 

  • चंदगड      :        19.96%
  • राधानगरी  :         26.50%
  • कागल      :         26.24%
  • कोल्हापूर दक्षिण : 24.87%
  • करवीर   :            25.50%
  • कोल्हापूर उत्तर :     24.66%

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर